चंद्रपूर - महानगरपालिकेने ( Chandrapur Municipal Corporation ) रेन वॉटर हार्वेस्टिंग ( Rain Water Harvesting ) सक्तीची केली आहे. यासंदर्भात मनपातर्फे जनतेला नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सदर नोटीसमध्ये दहा दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर वीस हजारांची दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. मात्र, याला आम आदमी पक्षाने विरोध दर्शवला आहे. हा उपक्रम काळाची गरज आहे, त्यासाठी मनपाने जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे होते. नागरिकांनी देखील याला प्रतिसाद दिला आहे. मात्र, असे न करता नागरिकांवर याचा भुर्दंड लावण्यात येत आहे, सर्वासामान्य नागरिकांवर हा अन्याय आहे, जर नागरिकांना असा त्रास दिला तर आप कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ( aap opposed fine on Rain Water Harvesting )
चंद्रपूर महानगर 3 झोनमध्ये विभागलेला आहे. अनेक झोनमध्ये कामगार वस्ती आहेत. ज्यात हातावर आणून पानावर खाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी जवळून 8 ते 10 हजार खर्च करणे परवडणारे नसल्याने जनतेची तक्रार आम आदमी पार्टीकडे नागरिक करीत आहेत. शहराचे सचिव राजू कुडे यांच्या नेतृत्वात मनपाला निवेदनातून विनंती करण्यात आली.
नागरिकांना अनुदान द्या, ते सहकार्य करतील - नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी पाच हजार अनुदान देण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग नंतर देण्यात येणारे हे अनुदान सुरुवातीलाच द्यावे. नंतर जे हार्वेस्टिंग करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कोरोना काळ असल्यामुळे मागील दोन वर्षापासून कामधंदे बंद होते. घर चालविणे असह्य झाले होते. परिस्थिती अजूनही सुदृढ झाली नाही. त्यातच हा रेन हार्वेस्टिंगची जबरदस्ती त्यामुळे मनपाने तात्काळ नोटिसा पाठवण्याचे बंद करावे अशी मागणी आपतर्फे करण्यात आली. कोणत्याही गोरगरीब जनतेवर दंडात्मकाची कारवाई आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही. येत्या तीन दिवसांत या नोटीसा देणे बंद केले नाही. तर गरीब जनतेला सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आप तर्फे देण्यात आला.
हेही वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधींची आज सलग तिसऱ्या दिवशी ED'कडून चौकशी
हेही वाचा - Girlfriend Murder In Sangli : प्रेयसीने बर्थडे गिफ्ट म्हणून मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने काढला काटा