ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष - एका माजी विद्यार्थ्याने आनंदवनाला दिली सुवर्ण भेट; नाव वाचून व्हाल थक्क

आनंदवनाचे मूळ विद्यार्थी असलेल्या भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक, डॉ.कृष्णा ईल्ला यांनी लसींची मदत केली आहे. त्यांनी तब्बल 4000 हजार लसींचे डोस त्यांनी थेट आनंदवनात पाठवले आहेत.

dr. krishna illa
dr. krishna illa
author img

By

Published : Jun 20, 2021, 12:43 PM IST

Updated : Jun 20, 2021, 1:05 PM IST

चंद्रपूर - आनंदवन हे केवळ कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन ठरले नाही तर येथील उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधेने अनेक मोठमोठे विद्यार्थी घडले आहेत. ज्यांनी संपूर्ण जगावर आपली वेगळी छाप सोडली आहेत. आज अशाच एका माजी विद्यार्थ्याने छोटीसी परतफेड म्हणून आनंदवनला मोठा सुखद धक्का दिला आहे. ह्या विद्यार्थ्याचे नाव आणि परिचय वाचून तुम्हीही थक्क व्हाल. कोरोनासाठी देशातील पहिली लसीची निर्मिती करणारे भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईल्ला. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून तब्बल 4000 हजार लसींचे डोस त्यांनी थेट आनंदवनात पाठवले आहेत.

आनंदवनाला दिली सुवर्ण भेट
कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे आनंदवन
आज आनंदवनला कुठल्याही परिचयाची गरज नाही. ज्या कुष्ठरुग्णांना आपल्याच कुटुंबातील लोकांना घरातून हाकलून लावले. त्या रंजल्या गांजल्याना हक्काचा आश्रय देण्याचे काम कर्मयोगी बाबा आमटे यांनी केले. फक्त एवढेच नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वाभिमानाने आणि सन्मानाने जावे हे सुध्दा त्यांनी पाहिले. आज संपूर्ण देशातील कुष्ठरुग्णांसाठी हे हक्काचे माहेरघर ठरले आहे. कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केल्यानंतर अनेक संस्थांची हळूहळू उभारणी केली.

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे आहेत विद्यार्थी

कुष्ठरोग्यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत अवगत करण्यासाठी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना कृषी शिक्षण देण्यासाठी १९६५ मध्ये आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाला उज्वल यशाची परंपरा लाभलेली आहे. अनेक विद्यार्थी आज चांगल्या हुद्यावर कार्यरत आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. कृष्णा इल्ला यांचं. हैदराबाद येथील भारत बायोटेक लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक आहे. याच कंपनीने भारताची पहिली कोवॅक्सीन ही कोरोना वरील लस तयार केली. डॉ. कृष्णा इल्ला हे मूळचे तामिळनाडू जवळील आंध्रप्रदेशातील छोट्याश्या गावातील असून आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते भारत बायोटेक या संस्थेचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत.

आनंदवनाला दिली गुरूदक्षिणा

कोरोना जागतिक महामारी मुळे गेल्या दोन वर्षांपासून आनंदवन च्या जीवनचक्राला खीळ बसलेली आहे. आनंदवनातील सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे अर्थचक्र थांबले आहे. सोबतच अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे निधन झाले. संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे तथा माजी प्राचार्य डॉ . शेलगावकर यांनी डॉ. कृष्णा इल्ला यांच्या निदर्शनास यांनी आणून दिली. तेव्हा कृषी महाविद्यालयातील माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी कुटुंब, विद्यार्थी आणि आनंदवनातील रहिवासी, रुग्ण यांच्यासाठी ४००० लसी मोफत देण्याचे दातृत्व दाखविले आहे. आनंदवनात या लसींची पहिली खेप पोहचली असून आज पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आनंदवन हे एकलव्य तयार करणार विद्यापीठ आहे असे कै. बाबा आमटे यांचे मत होते. असेच एकलव्य असलेले डॉ. कृष्णा इल्ला यांनी लसींची गुरुदक्षिणा देऊन आनंदवन ला मोलाची मदत केलेली आहे.
हेही वाचा - भारत बायोटक संचालकांचे चंद्रपूरशी खास नाते, आनंदवनाला पुरवणार 4 हजार 'कोव्हॅक्सिन'

चंद्रपूर - आनंदवन हे केवळ कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन ठरले नाही तर येथील उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधेने अनेक मोठमोठे विद्यार्थी घडले आहेत. ज्यांनी संपूर्ण जगावर आपली वेगळी छाप सोडली आहेत. आज अशाच एका माजी विद्यार्थ्याने छोटीसी परतफेड म्हणून आनंदवनला मोठा सुखद धक्का दिला आहे. ह्या विद्यार्थ्याचे नाव आणि परिचय वाचून तुम्हीही थक्क व्हाल. कोरोनासाठी देशातील पहिली लसीची निर्मिती करणारे भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईल्ला. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून तब्बल 4000 हजार लसींचे डोस त्यांनी थेट आनंदवनात पाठवले आहेत.

आनंदवनाला दिली सुवर्ण भेट
कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे आनंदवनआज आनंदवनला कुठल्याही परिचयाची गरज नाही. ज्या कुष्ठरुग्णांना आपल्याच कुटुंबातील लोकांना घरातून हाकलून लावले. त्या रंजल्या गांजल्याना हक्काचा आश्रय देण्याचे काम कर्मयोगी बाबा आमटे यांनी केले. फक्त एवढेच नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वाभिमानाने आणि सन्मानाने जावे हे सुध्दा त्यांनी पाहिले. आज संपूर्ण देशातील कुष्ठरुग्णांसाठी हे हक्काचे माहेरघर ठरले आहे. कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केल्यानंतर अनेक संस्थांची हळूहळू उभारणी केली.

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे आहेत विद्यार्थी

कुष्ठरोग्यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत अवगत करण्यासाठी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना कृषी शिक्षण देण्यासाठी १९६५ मध्ये आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाला उज्वल यशाची परंपरा लाभलेली आहे. अनेक विद्यार्थी आज चांगल्या हुद्यावर कार्यरत आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. कृष्णा इल्ला यांचं. हैदराबाद येथील भारत बायोटेक लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक आहे. याच कंपनीने भारताची पहिली कोवॅक्सीन ही कोरोना वरील लस तयार केली. डॉ. कृष्णा इल्ला हे मूळचे तामिळनाडू जवळील आंध्रप्रदेशातील छोट्याश्या गावातील असून आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते भारत बायोटेक या संस्थेचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत.

आनंदवनाला दिली गुरूदक्षिणा

कोरोना जागतिक महामारी मुळे गेल्या दोन वर्षांपासून आनंदवन च्या जीवनचक्राला खीळ बसलेली आहे. आनंदवनातील सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे अर्थचक्र थांबले आहे. सोबतच अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे निधन झाले. संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे तथा माजी प्राचार्य डॉ . शेलगावकर यांनी डॉ. कृष्णा इल्ला यांच्या निदर्शनास यांनी आणून दिली. तेव्हा कृषी महाविद्यालयातील माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी कुटुंब, विद्यार्थी आणि आनंदवनातील रहिवासी, रुग्ण यांच्यासाठी ४००० लसी मोफत देण्याचे दातृत्व दाखविले आहे. आनंदवनात या लसींची पहिली खेप पोहचली असून आज पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आनंदवन हे एकलव्य तयार करणार विद्यापीठ आहे असे कै. बाबा आमटे यांचे मत होते. असेच एकलव्य असलेले डॉ. कृष्णा इल्ला यांनी लसींची गुरुदक्षिणा देऊन आनंदवन ला मोलाची मदत केलेली आहे.
हेही वाचा - भारत बायोटक संचालकांचे चंद्रपूरशी खास नाते, आनंदवनाला पुरवणार 4 हजार 'कोव्हॅक्सिन'

Last Updated : Jun 20, 2021, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.