चिमूर (चंद्रपूर)- तालुक्यातील टेकेपार येथे एका नराधमाने 2 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आशिष आनंदराव कुलमेथे याला अटक केली आहे.
आशिष कुलमेथे (वय 25, रा. टेकेपार) याने आधी घराशेजारी असलेल्या 2 वर्षीय मुलाला त्याच्या घरी नेले व तेथे त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. हे कृत्य मुलाच्या आईच्या निदर्शनास आले. तिने आशिषला हटकले, मात्र आशिषने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाच्या आईने आरोपी आशिषविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आशिष कुलमेथेविरुद्ध भादवीच्या कलम 377, 504 व इतर कलमांसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस निरीक्षक कांता रेजिवाड करत आहे.
हेही वाचा- चंद्रपूर जिल्ह्यात 597 कोरोनाबाधित; 372 रुग्णांना आतापर्यंत सुट्टी