ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये घरात झोपलेल्या तान्हुल्यावर बिबट्याचा हल्ला; बाळाचा मृत्यू - child death

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपुरात अंगणात खाटेवर झोपलेल्या तान्हुल्यावर बिबट्याचा हल्ला
author img

By

Published : Jun 2, 2019, 10:12 AM IST

Updated : Jun 2, 2019, 10:31 AM IST

चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात घरात झोपलेल्या तान्हुल्याल्या बिबट्याने पळवल्याची घटना घडली. या हल्ल्यात ९ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला.

चंद्रपुरात अंगणात खाटेवर झोपलेल्या तान्हुल्यावर बिबट्याचा हल्ला

स्वराज सचिन गुरूनुले, असे या बाळाचे नाव आहे. तो घरी झोपेत असताना शनिवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून अलगद उचलले व तिथून बाहेर धूम ठोकली. बाळाचा आवाज आणि झालेली हालचाल पाहून घरचे लोक जागे झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्या बाळाला घेवून गावाच्या बाहेर निघून गेला होता. पायाच्या खुणावरून बिबट्या असल्याचे लक्षात आल्याने गावकऱ्यांनी ही बाब सिंदेवाही वनपरिक्षेत्र वनविभाग व पोलिसांना कळविली. दोन्ही विभागाचे कर्मचारी, गावकरी यांनी शोध घेतला असता वाकल रोडवर तलावाजवळ बांबूच्या झुडुपात छिन्नविछिन्न अवस्थेत स्वराजचा मृतदेह आढळला. बिबट्याने स्वराजचा एक पायच तोडून नेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलीस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी चौकशी करीत आहे. गावकरी आणि वनविभागाचे अधिकाऱ्यांत घटनेच्या सत्यतेवरून वाद होत असून यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

चंद्रपूर :- ९ महिन्याच्या तान्हुल्याचा  बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, स्वराज सचिन  गुरनुले असे तान्हुल्याचे नाव,  सिंदेवाही तालुक्यातील  गडबोरी गावातील घटना, अंगणात खाटेवर असलेल्या तान्हुल्याला पळविले, आरडाओरड आणि  शोधाशोध झाल्यावर सापडला मृतदेह, वनपथक गावात दाखल, तणावाची स्थिती
Last Updated : Jun 2, 2019, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.