ETV Bharat / state

माझ्या मुलाचे हत्यारे अजूनही मोकाट, वृद्ध पित्याचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार - superintendent of police

मृत मुलाच्या न्यायासाठी 80 वर्षांच्या वृद्ध पित्याला लागत आहेत उंबरठे झिजवायला.

चंद्रपूर
author img

By

Published : May 27, 2019, 9:43 PM IST

चंद्रपूर - एका 80 वर्षांच्या वृद्ध पित्याला आपल्या मृत मुलाच्या न्यायासाठी उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यांच्या मुलाचा गावातील काही लोकांनी खून केला. मात्र, महिना लोटूनही अद्याप कुणावरही कारवाई झाली नाही, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली आहे.

चंद्रपूर

निळकंठ बाजीराव सालेकर हे वरोरा तालुक्यातील जामखुला या गावात राहतात. त्यांचा चाळीस वर्षीय एकुलता एक मुलगा अंकुश हा शेतमजुरीचे काम करून कुटुंबाची गुजराण करीत होता. तो धार्मिक असल्याने गावातील नागमंदिरात सकाळ-संध्याकाळ जाऊन पूजाअर्चा करीत होता. मात्र, अंकुशला गुलाब नामदेव येरेकार, देविदास सालेकर, गजानन धोटे आणि नंदा पुजारीन हे मंदिरात येऊ देत नव्हते. यासाठी त्याला अनेकदा मारहाणही करण्यात आली. हे आरोपी आपल्या शेळ्या अंकुशच्या शेतात चरायला पाठवीत होते. त्यास मज्जाव केल्याने हे आरोपी अंकुशवर डूक धरून होते. त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली.

28 एप्रिलला अंकुश घरी आला नाही. त्याची शोधाशोध करण्यात आली. 30 एप्रिलला अंकुशचा मृतदेह त्याच्या शेतातील तणीसाच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग होते. तसेच त्याच्या डोक्यावर हत्याराने वार करण्यात आला होता, असे वडिलांचे म्हणने आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. माझ्या मुलाची हत्या केली, अशी तक्रार वडिलांनी पोलिसांकडे केली. त्यांना शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच तक्रार घेऊ असे सांगण्यात आले. एक महिना होऊन गेला तरी ना अहवाल आला ना तक्रार घेण्यात आली. तक्रार करण्यासाठी अखेर 80 वर्षीय पित्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घ्यावी लागली. तशी तक्रार त्यांनी केली आहे. मात्र, या प्रकरणात खरेच चौकशी होईल का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

Intro:चंद्रपुर : एका 80 वर्षाच्या वृद्ध पित्याला आपल्या मृत मुलाच्या न्यायासाठी उंबरठे झिजवावे लागत आहे. आपल्या मुलाचा गावातील काही लोकांनी खून केला. मात्र महिना लोटूनही अद्याप कुणावरही कारवाई झाली नाही असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली आहे.Body:निळकंठ बाजीराव सालेकर वरोरा तालुक्यातील जामखुला या गावात राहतात. त्यांचा चाळीस वर्षीय एकुलता एक मुलगा अंकुश हा शेतमजुरीचे काम करून कुटुंबाची गुजराण करीत होता. तो धार्मिक असल्याने गावातील नागमंदिरात सकाळ-संध्याकाळ जाऊन पूजाअर्चा करीत होता. मात्र, अंकूशला मंदिरात येऊ देण्यास गुलाब नामदेव येरेकार, देविदास सालेकर, गजानन धोटे आणि नंदा पुजारीन हे मंदिरात येऊ देत नव्हते. यासाठी त्याला अनेकदा मारहाणही करण्यात आली. हे आरोपी आपल्या शेळ्या अंकुशच्या शेतात चरायला पाठवीत होते. याचा मज्जाव केल्याने हे आरोपी अंकुशवर डूख धरून होते. त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. 28 एप्रिलला अंकुश घरी आला नाही. त्याची शोधाशोध करण्यात आली. 30 एप्रिलला अंकुशचा मृतदेह त्याच्या शेतातील तणीसाच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग होते. तसेच त्याच्या डोक्यावर हत्याराने वार करण्यात आला. असे वडीलाचे म्हणने आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. माझ्या मुलाची हत्या केली या अशी तक्रार वडिलांनी पोलिसांकडे केली. त्यांना पोस्टमार्टेमची रिपोर्ट आल्यानंतरच तक्रार घेऊन असे सांगण्यात आले. एक महिना लोटला ना रिपोर्ट आला ना तक्रार घेण्यात आली. ही तक्रार करण्यासाठी अखेर या 80 वर्षीय पित्याला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घ्यावी लागली. तशी तक्रार त्यांनी केली आहे. मात्र, या प्रकरणात खरंच चौकशी होईल का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.