ETV Bharat / state

लॉकडाऊन : धान्य अफरातफरीप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

धान्याचा काळाबाजार करण्यासाठी गौतम ठकसेन पाटील यांच्या मालकीच्या पिकअप (क्रमांक एम एच ३४ एम ३७०८) वाहनाने भरधाव वेगाने गाडी जात असताना ग्रामस्थांनी तिचा पाठलाग करून चोरीचे धान्य पकडून शेगांव पोलीसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी तहसीलदार संजय नागतीलक व ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी येऊन पंचनामा केला. यात, गाडीत तांदळाचे १८ कट्टे, ३१ हजार ५०० रुपये यासह पिकअप गाडी शेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

author img

By

Published : Apr 15, 2020, 1:29 PM IST

धान्य अफरातफरी प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वहानगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य अफरातफर व होणारा काळाबाजार गावकऱ्यांच्या दक्षतेने उघडकीस आला. तांदळाचे १८ कट्टे, ३१ हजार ५०० रुपये आणि एक पिकअप (क्रमांक एमएच ३४ एम ३७०८) ने विल्हेवाट करण्याकरता नेताना रंगेहात गावकऱ्यांनी पकडून शेगाव पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींविरोधात गुन्हे नोंदवून ६ आरोपींना अटक केली.

धान्य अफरातफरीप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

गरिबांच्या हक्काच्या धान्याची अफरातफर व काळाबाजाराविषयी कार्यवाही करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीला अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नव्हती. यामुळे, शेवटी झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात वहाणगांव येथील उपसरपंच तथा मनसे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, गावातील सहकारी सुधाकर दडमल, तमुस अध्यक्ष गजानन गायकवाड, बंडूजी भोयर यांनी सोबत सावरी गाठली. याची माहीती तहसीलदार चिमूर व शेगाव पोलिसांनाही दिली, सावरी या गावामधून अफरातफर केलेल्या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी गौतम ठकसेन पाटील यांच्या मालकीच्या पिकअप (क्रमांक एम एच ३४ एम ३७०८) वाहनाने भरधाव वेगाने गाडी जात असतांना तिचा पाठलाग करून चोरीचे धान्य पकडून शेगांव पोलीसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी तहसीलदार संजय नागतीलक व ठानेदार सुधीर बोरकुटे यांनी येऊन पंचनामा केला. यात, गाडीत तांदळाचे १८ कट्टे, ३१ हजार ५०० रुपये यासह पिकअप गाडी शेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

सदर प्रकरणात पुरवठा निरीक्षक अनिल उपरे यांच्या फिर्यादीवरून स्वस्त धान्य परवाना धारक मंगलाबाई गुलाबराव गौरकर, भोपालसिंग बावरी, नितीन शंकरराव भगत, सुरज प्रकाश रामटेके सर्व राहणार वाहानगाव तथा गुजगव्हान येथील गौतम ठकसेन पाटील, शंकर लहानू रामटेके, प्रशांत बिजाराम जिवतोडे यांच्यावर गुन्हे नोंदवून मंगलाबाई वृद्ध असल्याने तिला सोडून सहा आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत शेगाव पोलीस ठाणेदार यांच्या सोबत मनोहर खोब्रागडे, मनोहर आमने, रवि तुरणकर व समीर पठाण यांनी कर्तव्य बजावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.