ETV Bharat / state

Grampanchayat Result 2022 : राजकिय पक्षांचे दावे-प्रतिदावे; चंद्रपूरात 59 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर - Chandrapur district

जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींचा निकाल ( Gram Panchayat Election results ) आता जाहीर झाला आहे. पहिल्यांदाच सरपंचपदाची जनतेतुन निवड करण्यात आली. सरपंच पदाचे उमेदवार राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर मैदानात उतरले नाही. मात्र आता निकालनंतर ( Grampanchayat Result 2022 ) सरपंच आमच्याच पक्षाचा असे दावे-प्रतिदावे सुरु झाले आहे.

Grampanchayat Result
ग्रामपंचायत निवडणूक निकाल
author img

By

Published : Dec 20, 2022, 7:52 PM IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ( Grampanchayat Result 2022 ) एकूण 1 हजार 261 उमेदवार रिंगणात होते. यात सरपंच पदाचे 195 उमेदवारांचा समावेश होता. मतमोजणी अपवाद वगळता शांतते पार पडली. सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होत आहे. आता अनेक ग्रामपंचायतींमध्ये बहुमत एकाचे आणि सरपंच दुसराच असे चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींचा निकाल ( Gram Panchayat Election results in Chandrapur district ) आता जाहीर झाला आहे. सरपंच पदाचे उमेदवार राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर मैदानात उतरले नाही. मात्र आता निकालनंतर सरपंच आमच्याच पक्षाचा असे दावे-प्रतिदावे सुरु झाले आहे.

महाविकास आघाडीचा दावा : कॉंग्रसचे आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा मतदार संघात सतरा ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडली. यात कोरपना तालुक्यात दहा ग्रामपंयातपैकी नऊ ग्रामपंचायवर शेतकरी संघटना-भाजप युतीचे उमेदवार विजयी झाला दावा केला जात आहे. एकमेव कवठाळा ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीच्या सरपंच निवडून आल्याचा दावा विरोधकांचा आहे. राजुरा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचा तर एका ठिकाणी भाजप समर्थित उमेदवार निवडणून आला.

निकालात संमिश्र यश : जिवती तालुक्यात भाजप- गोंडवाना गणतंत्र पक्ष दोन आणि शेतकरी संघटनेचा सरपंच एका ठिकाणी विजयी झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपुरात मतदार संघात कॉंग्रेस आणि भाजपच्या दाव्यानुसार दोघांनाही संमिश्र यथ मिळालेले दिसत आहे. मुल तालुक्यात सात पैकी चार ग्रामपचायतमध्ये कॉंग्रेसचा तर तीन ठिकाणी भाजपचा सरपंच असेल. बल्लारपूर तालुक्यात भाजप आणि कॉंग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी दोन सरपंच आले. पोंभूर्णा तालुक्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही प्रत्येकी एक सरपंच मिळाला आहे. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली.

वडेट्टीवार यांच्या मतदार संघात बाजी : चंद्रपूर विधानसभेतील पाच ग्रामपंचायत मध्ये भाजप, कॉंग्रेस, गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि शिवसेना (ठाकरे) यांना प्रत्येकी एका ग्रामपंचायत मध्ये सरपंच मिळाले. एका ठिकाणी महाविकास आघाडीचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला. माजी पालकमंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरीत मतदार संघात सहा ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला. सिंदेवाही तालुक्यात भाजप दोन आणि कॉंग्रेस समर्थित उमेदवार एका ठिकाणी विजयी झाला. ब्रह्मपुरीत तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत कॉंग्रेसचा ताब्यात आली.

तालुक्यातील निकाल : सावली तालुक्यातील दोन ग्रामपंचायत भाजप आणि एका ठिकाणी कॉंग्रेसचा सरपंच विजयी झाला. चिमूर विधानसभा मतदार संघात नागभीड तालुक्यात पाच पैकी चार कॉंग्रेस तर एका ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच विजयी झाले. चिमूर तालुक्यात सुद्धा प्रत्येकी दोन ग्रामपंचायत कॉंग्रेस आणि भाजपचा सरपंच निवडून आला तर एका ग्रामपंचायवर अपक्षाने बाजी मारली. कॉंग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा-भद्रावती मतदार संघात आठ ग्रामपंचाय मध्ये निवडून आलेल्या सरपंच उमेदवारांवर प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप दावा केला नाही. केवळ वरोरा तालुक्यातील एका ग्रामपंचायवर आमचा सरपंच निवडून आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे म्हणणे आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर झाल्या नाहीत. गावपातळीवर आघाड्या स्थापन करुन उमेदवार रिंगणात उतरले. त्याला राजकीय पक्षांना समर्थन दिले. मात्र निवडून येणारा उमेदवार जोपर्यंत संबंधित पक्षाच्या मंचावर अधिकृत दिसणार नाही. तोपर्यंत त्या उमेदवारावर आपलाच उमेदवार असा दावा करता येणार नाही. गावखेड्यातील राजकारण बेभारवशाचे असते. त्यामुळे निवडणुन आलेले उमेदवार कोणत्या तंबूत अधिकृत दाखल होईल. त्यानंतरच राजकीय पक्षाकडून सरपंच आमचाच, असा दावा केला जावू शकतो, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्हा पक्षांनी आपलेच सरपंच पदाचे जास्त उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे.

आम्हीच अव्वल; भाजपचा दावा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून ५९ ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पार्टीने २४ जागांवर विजयी मिळविला तर युतीमध्‍ये ४ जागांवर विजय मिळवित २८ जागांवर विजय प्राप्‍त करत पुन्हा एकदा अव्‍वल स्‍थान राखले आहे, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखविला आहे असा दावा भाजपकडून करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.