ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 571 कोरोनामुक्त - चंद्रपूरमध्ये 571 कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 82 हजार 10 वर पोहोचली आहे, तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 728 आहे. सध्या 3 हजार 859 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

चंद्रपूरमध्ये 571 कोरोनामुक्त
चंद्रपूरमध्ये 571 कोरोनामुक्त
author img

By

Published : May 28, 2021, 11:51 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 571 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 220 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूरमध्ये 571 कोरोनामुक्त
चंद्रपूरमध्ये 571 कोरोनामुक्त

आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 10
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 82 हजार 10 वर पोहोचली आहे, तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 728 आहे. सध्या 3 हजार 859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 63 हजार 698 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 लाख 78 हजार 862 नमुने निगेटीव आले आहेत.

आजचे मृत
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दाताळा येथील 62 वर्षीय पुरुष, 51 व 55 वर्षीय पुरुष, पडोली येथील 65 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 46व 65 वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील 65 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 28 वर्षीय महिला, पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील 65 वर्षीय महिला, गडचांदूर येथील 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आतापर्यंत 1423 बाधितांचे मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 1423 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1319, तेलंगणा दोन, बुलढाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा 1, गोंदिया 2 आणि नागपूर येथील 2 बाधितांचा समावेश आहे.

आजचे बाधित
आज बाधित आलेल्या 220 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 56, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर 27, भद्रावती 37, ब्रम्हपुरी 03, नागभीड 02, सिंदेवाही 10, मूल 14, सावली 05, पोंभूर्णा 08, गोंडपिपरी 13, राजूरा 02, चिमूर 01, वरोरा 08, कोरपना 15, जिवती 01 व इतर ठिकाणच्या 01 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी त्रिसुत्रीचा वापर करावा
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा- सोलापुरात गुरुवारी आढळले 940 रुग्ण तर 23 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.