ETV Bharat / state

ब्रम्हपुरी येथील 28 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल 'पॉझिटिव्ह'; रुग्ण संख्या 6 वर

author img

By

Published : Jun 6, 2020, 6:30 PM IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 28 झाली आहे, अशी महिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली.

कोरोना चंद्रपूर, corona chandrapur
corona chandrapur

चंद्रपूर- ब्रम्हपुरी तालुक्यातील अडयाळ टेकडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेला 28 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाबाधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असून सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 28 झाली आहे, अशी महिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली.

गहलोत यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा युवक मुंबई येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. 2 जून रोजी त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. मात्र, अहवाल अनिश्चित होता. लक्षणे दिसून आल्याने काल 5 जून रोजी युवकाचा पुन्हा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. आज त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत) 20 मे ( एकूण 10 बाधीत ) 23 मे ( एकूण 7 बाधीत ) व 24 मे ( एकूण बाधीत 2 ) 25 मे ( एक बाधीत ) 31 मे ( एक बाधीत ) 2 जून ( एक बाधीत ) 4 जून ( दोन बाधीत ) 5 जून ( एक बाधीत ) 6 जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित 28 झाले आहेत. आतापर्यत 22 कोरोनाबाधित बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 28 पैकी अक्टिव्ह बधितांची संख्या आता 6 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.