ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 31 जण कोरोनामुक्त; तर १६ नव्या रुग्णांची भर

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 361 रुग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 749 रुग्णांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 18, 2020, 12:02 AM IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1 हजार 121 झाली आहे. गेल्या 24 तासात 16 नवीन बाधित समोर आले असून 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 749 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 361 रुग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 749 रुग्णांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी बहुतांशी रुग्ण हे अन्य आजाराने त्रस्त होते.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 8 जणांचा सहभाग आहे. यामध्ये बालाजी वार्ड, जटपुरा गेट, पंचशील चौक, सितलामाता परिसरातील बाधितांचा समावेश आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, एकमेकांत अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

चंद्रपूर पाठोपाठ राजुरा तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे. यामध्ये टेंभुरवाही व अमराई वार्ड, बहाडे प्लॉट येथील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भद्रावती तालुक्यातील हनुमान वार्ड येथील 2 बाधित तर सुमठाणा येथील एक बाधित अशा एकूण 3 जणांचा सहभाग आहे. संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मूल येथील एका बाधिताचा समावेश आहे. भेजगाव येथील बाधित संपर्कातून पुढे आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.