मुंबई - कुर्ला येथील बैल बाजार परिसरात आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला फाशी देऊन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. अनुजा दीपक वंजारी (वय ३०) असे या महिलेचे तर दीपक वंजारी (वय ४ वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अनुजा वंजारी या आपल्या पती व मुलासह विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगारे वाडी येथे राहतात. १२ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अनुजाने मुलासह आपले जीवन संपवले. बऱ्याच वेळ त्या घरातून येत नसल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असता, डॉक्टरांनी तपासून या दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी विनोबा भावे पोलिसांनी दीपक वंजारीला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीच्या आधारे पती दारूच्या अधीन झाला होता. तर अनुजाने सकाळी आपल्या आईला सोलापूर येथे फोन करुन आपण काही बरे वाईट करणार असल्याचेही कळवले होते. मात्र, आईने तिला असे करू नको म्हणून सांगितल्याची चर्चा परिसरात आहे.