ETV Bharat / state

वाडीबंदर रेल्वे यार्डाजवळ झालेल्या हत्येप्रकरणी २ आरोपींना अटक - रेल्वे

घटनेच्या दिवशी मृत अब्दुल आणि २ आरोपीत भांडण झाले होते. या दरम्यान अब्दुल यास आरोपी शिवानंद व राजा यांनी मारहाण केली आणि डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली.

आरोपी
author img

By

Published : Mar 29, 2019, 2:38 PM IST

मुंबई - वाडीबंदर रेल्वे यार्ड, गेट नंबर ११ च्या आतील बाजूच्या गेटजवळ ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर अज्ञातांनी सिमेंटचा ब्लॉक मारुन हत्या केली होती. २५ मार्च रोजी ही घटना घडली होती. डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली होती. तर, दुसऱ्या आरोपीला पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे.

डोंगरी पोलीस

डोंगरी पोलिसांना तपासामध्ये अनोळखी व्यक्तीचे नाव अब्दुल रेहमान (मुळ गांव, त्रिवेंद्रम, केरळ) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावर तपासलेले साक्षीदार आणि बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मृत अब्दुल रहेमान याची हत्या त्याचा मित्र शिवानंद बसवराज कटनळळी ऊर्फ शिवा ऊर्फ राजू (वय ३५ वर्षे) आणि राजा यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.

घटनेच्या दिवशी मृत अब्दुल आणि २ आरोपीत भांडण झाले होते. या दरम्यान अब्दुल यास आरोपी शिवानंद व राजा यांनी मारहाण केली आणि डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी शिवानंद बसवराज कटनळळी ऊर्फ शिवा ऊर्फ राजु यास चांभार गोदी येथील नारंगी गेटच्या कंपाउंडजवळ सापळा रचून अटक केली. तर, दुसरा आरोपी राजा यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Intro:25 मार्च रोजी मुंबईतील वाडीबंदर रेल्वे यार्ड, गेट नंबर ११ च्या आतील बाजूस. गेट जवळ, एका ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी इसमाच्या चेहऱ्यावर कोणीतरी अज्ञात इसमाने सिमेंटचा ब्लॉक मारून जिवे ठार मारल्याने डोंगरी पोलिस ठाणे येथे गु र क्र ६०/१९ कलम ३०२ भा द वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होताBody: सदर नोंद गुंह्याच्या तपासामध्ये अनोळखी मयत इसमाचे नाव अब्दुल रहेमान असे समोर आले , मयत हा केरळ मधील त्रिवेन्द्रम या ठिकानचा राहणारा असल्याचे समोर आले होते. या हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळावर तपासलेले साक्षीदार आणि बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मयत अब्दुल रहेमान याचा खून
त्याचे मित्र नामे शिवानंद बसवराज कटनळळी ऊर्फ शिवा ऊर्फ राजू ( ३५ ) वर्षे आणि राजा यानी केला असल्याचे निष्पन्न झाले . घटनेच्या दिवशी मयत अब्दुल व दोन आरोपीत भांडण झाले होते या दरम्यान मयतरल अब्दुल यास आरोपी शिवानंद व राजू यांनि मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या केली होती.Conclusion:या प्रकरणी पोलिसांनी शिवानंद बसवराज कटनळळी ऊर्फ शिवा ऊर्फ राजु, ( ३५ ) यास चांभार गोदी येथील नारंगी गेट च्या कंपाउंड याठिकाणी सापळा रचून अटक केली आहे तर या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी राजा याचा शोध पोलीस घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.