ETV Bharat / state

केईएममध्ये रुग्णाच्या नातेवाईकांसाठी उन्नती फाउंडेशनकडून अल्पोपहार वाटप

मुंबईतल्या केईएम रुग्णालय हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो गरीब रुग्णांसाठी जीवनदायी आहे. परंतु, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी हेळसांड होते. यासाठी उन्नती समाजसेवा फाऊंडेशनने अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू केला.

उन्नती फाऊंडेशनतपर्फे अल्पोपहार वाटप
author img

By

Published : May 19, 2019, 11:15 PM IST

Updated : May 20, 2019, 10:38 AM IST

मुंबई - गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून केईएम रुग्णालयाची ओळख आहे. येथील रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची हेळसांड होऊ नये, यासाठी उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्यावतीने मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आले.

उन्नती फाऊंडेशनतपर्फे अल्पोपहार वाटप करताना

उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोटभर अन्न मिळत असल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. मुंबईतल्या केईएम रुग्णालय हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो गरीब रुग्णांसाठी जीवनदायी आहे. इथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी हेळसांड होते. शिवाय, दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईमुळे त्यांना जेवण मिळणेही कठीण होते. काही रुग्णांच्या नातेवाईकांना तर अर्धपोटी राहून दिवस काढावे लागतात. यासाठी उन्नती समाजसेवा फाऊंडेशनने अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू केला. सकाळी ६ वाजून ३० मिनिटाला सुरू झालेल्या उपक्रमाचा तब्बल ४०० लोकांनी लाभ घेतला.

उन्नतीच्या अन्नदानाच्या उपक्रमामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष शिरीष पारीख, अमोल पवार, रुपेश मोरे, सुनील पुजारी, जगदिश नलावडे, नूतन बाबदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील बनकर आणि सहकारी यांनी भाग घेतला होता.

Intro:बातमीला व्हिडीओ सोबत जोडले आहेत.

Location- मुंबई

Slug- MH_Panvel_FoodForNeedy_AVB_19May2019_PramilaPawar_Vis1

Anchor
गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची हेळसांड होऊ नये म्हणून उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्या वतीने मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आलं. उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोटभर अन्न मिळत असल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.Body:मुंबईतल्या केईएम रुग्णालय हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो गरीब रुग्णांसाठी जीवनदायी आहे. इथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात, परंतु त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी हेळसांड होते. शिवाय, दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईमुळे त्यांना जेवण मिळणेही कठीण होते. काही रुग्णांच्या नातेवाईकांना तर अर्धपोटी राहून दिवस कंठावे लागत आहेत. म्हणून उन्नती समाजसेवा फाऊंडेशनने भुकेलेल्यास अन्नदान करण्याचा स्तुत्य कार्यक्रम सुरू केला आहे. सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरू केलेल्या या उपक्रमात तब्बल चारशे लोकांनी याचा लाभ घेतला. रुग्णांच्या नातेवाईकांना अल्पोपहार तेही मोफत मिळतं. त्यामुळं अन्नदाता सुखी भवं असं म्हणत तेही उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्या तरुणांना आशीर्वाद देतात.Conclusion:
...हे करताहेत पुण्यकर्म

आजच्या काळात बार-पबमध्ये डान्स करून, दारू पिऊन, डीजे लावून, धिंगाणा घालून करणारे तरुण आपण पाहतो. आईवडिलांना काळजीत पाडणारे प्रकार टाळले आणि त्याजागी तो वेळ समाजातील गरजू सोबत घालवला किंवा देशहितासाठी दुसऱ्याच्या कामी येण्यासाठी घालवला तर नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी आपण आदर्श निर्माण करू शकू, असा विचार करून उन्नती समाजसेवा फाऊंडेशनच्या तरुणांनी नवा आदर्श उभा केलाय. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे उपअध्यक्ष शिरीष पारीख, अमोल पवार, रूपेश मोरे, सुनील पुजारी, जगदिश नलावडे, नूतन बाबदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील बनकर व सहकारी यांनी हा अन्नदानाचे पुण्यकर्म करून नवा आदर्श उभा केलाय.
Last Updated : May 20, 2019, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.