ETV Bharat / state

...तर उद्या दाऊद हा काँग्रेसचा अध्यक्ष होईल - उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या महाआघाडीवर टीका करताना ती महाभेसळ असल्याची उद्धव ठाकरेंनी टीका केली. आमच्याकडे नेतृत्व आहे. विरोधकांकडे कोणते नेतृत्व आहे ते सांगावे असे त्यांनी आव्हानही दिले. देशद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा देखील देशद्रोहच आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 10, 2019, 5:05 AM IST

मुंबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देशद्रोहाचे कलम काढायला निघाले आहेत. तसे झाल्यास उद्या दाऊद हा काँग्रेसचा अध्यक्ष होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर केली. ते दक्षिण मुंबई मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या रेस कोर्स येथील प्रचार सभेत बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशद्रोहाचे कलम काढण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर खरपूस टीका केली. राहुल गांधींनी एका भाषणात १२४ (अ) कलम काढू असे सांगितले आहे. या कलमानुसार देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई होते. ही कारवाईच टाळली तर देशात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी उद्धव ठाकरेंनी भीती व्यक्त केली. देशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करायचे नाहीत तर त्यांना दूध पाजायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींना पंतप्रधान करायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसची महाआघाडी म्हणजे महाभेसळ-उद्धव ठाकरे
काँग्रेसच्या महाआघाडीवर टीका करताना ती महाभेसळ असल्याची उद्धव ठाकरेंनी टीका केली. आमच्याकडे नेतृत्व आहे. विरोधकांकडे कोणते नेतृत्व आहे ते सांगावे असे त्यांनी आव्हानही यावेळी दिले. देशद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा देखील देशद्रोहच आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका केली. लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. भवितव्य कुणाच्या हातात सुरक्षित राहणार याची ही निवडणूक आहे. ज्यांच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित आहे, त्यांनाच आम्ही समर्थन देत असल्याचे सांगत त्यांनी युतीचे समर्थन केले.

रेस कोर्स मुंबईकरांसाठी खुला झाला पाहिजे- उद्धव ठाकरे
मुंबईच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांचे कौतूक केले. अनेक प्रश्नांचा सावंत यांनी संसदेत पाठपुरावा केला आहे. मुंबईचा पूर्व किनारा आणि रेस कोर्सही मुंबईकरांसाठी खुला झाला पाहिजे. या रेसकोर्सवर थीम पार्क बनवण्याची आमची इच्छा अजूनही कायम असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंना म्हणाले भोक पडलेला फुगा
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यादिवशीच्या घेतलेल्या सभेत राहुल गांधी यांचे समर्थन केले होते. यावर बोलताना राज ठाकरेंचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी त्यांना सगळे भोक पडलेले फुगे असल्याचे म्हटले. आघाडीने कुणाचीही मदत घ्यावी आता काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिलिंद देवरा यांना सांभाळून बोलण्याचा सूचक इशारा-
दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलींद देवरा यांचे वडील दिवंगत मुरली देवरा यांना मुंबईचे महापौर अशी ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून दिली होती. अशी आठवण करून देत मिलिंद देवरा यांनी सांभाळून बोला, असा सूचक इशारा दिला.

Intro:देशद्रोहाचे कलम काढल्यास उद्या दाऊद काँग्रेसचा अध्यक्ष होईल - उद्धव ठाकरे

मुंबई ९

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देशद्रोहाचे कलम काढायला निघाले आहेत , असे झाल्यास उद्या दाऊद काँग्रेसचं अध्यक्ष होईल अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे . दक्षिण मुंबई मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या रेस कोर्स इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .

राहुल गांधी यांनी एक भाषणात 124 (अ)कलम काढू असे सांगितले आहे . देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर या कलमाच्या देशद्रोहाची कारवाई होते . ही कारवाईच टाळली तर देशात अतिशय गंभीर परिस्तिथी निर्माण होईल . देशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करायचे नाहीत तर त्यांना दूध पाजायचे का? असा सवाल करत ठाकरे यांनी अश्या राहुल गांधींना पंतप्रधान करायचे का? असं प्रश्नही कार्यकर्त्यांना केला .

देशात महाआघाडीनंसून महाभेसळ असल्याचे ते म्हणाले , आमच्याकडे नेतृत्व आहे ,विरोधकांकडे कोणते नेतृत आहे ते सांगावे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले . देहद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा देखील देशद्रोहच आहे असेही त्यांनी सांगितले . लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. भवितव्य कुणाच्या हातात सुरक्षित राहणार याची ही निवडणूक आहे. ज्यांच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित आहे त्यांनाच आम्ही समर्थन देतोय असेही ठाकरे यावेळी म्हणाले .

मुंबईत रेस कोर्स मुंबईकरांसाठी खुला झाला पाहिजे

मुंबईच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांची प्रशंसा केली . अनेक प्रश्नांचा सावंत संसदेत पाठपुरावा केला आहे . मुंबईचा पूर्व किनारा आणि रेस कोर्स हि मुंबई कारणांसाठी खुला झाला पाहिजे . या रेसकोर्सवर थीम पार्क बनवण्याची आमची इच्छा अजूनही कायम असल्याचे ठाकरे म्हणाले .

राज ठाकरे भोक पडलेला फुगा

गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले होते होते . राज यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावरही टीका करताना आघाडीने कुणाचीही मदत घ्यावी आता काहीही फरक पडत नाही . ते सगळे भोक पडलेले फुगे असल्याचे उद्धव यांनी म्हटले .

दरम्यान दक्षिण मुंबईत काँग्रेसचे उमेदवार मिलींद देवरा यांचे वडील दिवंगत मुरली देवरा यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईचे महापौर करून ओळख निर्माण केली होती अशी आठवणही यावेळी ठाकरे यांनी काढली . त्यामुळे मिलिंद देवरा यांनी सांभाळून बोलावे अशी ताकीदही यावेळी त्यांनी दिलीBody:......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.