मुंबई - मुंबई विद्यापीठाने नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी (नॅड ) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर मागील सहा वर्षाच्या ११ लाख पदव्याचा तपशील पडताळणीसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील तात्काळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे, तसेचयाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी होणार आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणांना आळा बसणार आहे. मात्र ही सेवा विद्यार्थ्यांना नॅडच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ही उपलब्ध होणार आहे.
या सेवेसाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ( एनएसडीएल ) या संस्थेची नियुक्ती केली. विद्यापीठ अनुदान
आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठात नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलसोबत मुंबई विद्यापीठाने करार केलेला आहे.यानुसार विद्यापीठाने २०१३ पासून ते २०१९ पर्यंतची ६ वर्षाची ११ लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती या नॅडच्या ऑनलाईन पोर्टलवर करून दिलेली आहे.
वर्षनिहाय उपलब्ध पदवीचा तपशील
२०१४ : १,९३,३९८
२०१५ : १,८५,४६७
२०१६ : १,६१,९१४
२०१७ : १,६८,७४३
२०१८ : १,८९,५३८
२०१९ : १,९३,५८९
एकूण : १०,९२,६४९