मुंबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमानांच्या घोटाळ्याबाबत उद्योगपती अनिल अंबानी यांना सातत्याने लक्ष केले असतानाच त्यांचे बंधू उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिल्याने देशभरात खळबळ उडाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . देवरा यांना पाठींबा देणारा विडिओ स्वतः देवरा यांनी ट्विट केला आहे . या व्हिडिओत अंबानी यांच्यासह कोटक महिंद्रा ग्रुपचे उदय कोटक यांनीही देवरा यांना पाठिंबा दर्शवला आहे .
देवरा हे दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असून त्यांना सामान्य व्यापाऱ्यांचे प्रश्न माहित आहेत . पुढच्या काळात ते नक्कीच यावर काम करतील ,अशा आशयाचा हा विडिओ आहे .यात सामान्य व्यापाऱ्यांच्या ही प्रतिक्रिया समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
मिलिंद देवरा यांचे वडील दिवंगत मुरली देवरा लागोपाठ तेरा वर्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते . तसेच त्यांनी लोकसभेत दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व हि केले होते .त्याचबरोबर यूपीए सरकारच्या काळात ते पेट्रिलियम मंत्रीही होते . दिवंगत देवरा यांचे देशातल्या अनेक उद्योगपतींशी सलोख्याचेसंबंध होते . तसेच त्यांच्यात मतदार संघात देशातले अनेक बडे उद्योजक यांचेही निवास्थान होते . काँग्रेस मधील उद्योगपतींशी थेट संवबंध असणारा नेता अशी मुरळीभाई यांची ओळख होती. याच संबंधांवर मिलिंद देवरा यांच्याशी मुकेश अंबानी यांची ओळख असल्याचे चर्चिले जात आहे . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय जवळीक असतानाही मुकेश अंबानी यांनी देवरा यांना पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे . देशात दोन टप्प्यातले मतदान झाल्यांनतर अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर देशात राजकीय वारे कुठे वाहत आहेत याबाबत जोरदार चर्चा जनसामान्यात सुरु आहे . याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष अशीशेलार यांना विचारले असता भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी बिजनेस हाऊसची गरज नसल्याचे ते म्हणाले .तसेच भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसलाच बिजनेस हाऊसची गरज असल्याचे स्पष्ट होत असल्याचे शेलार यांनी म्हटले .