ETV Bharat / state

सोलारच्या माध्यमातून एसटी महामंडाळाची उर्जाबचत - मुंबई

मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या वीज बिलात महिन्याला ३० ते ३२ हजार रुपयांची बचत होत आहे.

एसटी महामंडळाचा सोलार उर्जा प्रकल्प
author img

By

Published : May 25, 2019, 9:44 PM IST

मुंबई - ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने प्रकल्प सुरू केले आहेत. त्याअंतर्गत विविध शासकीय इमारतींवर हरित ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या वीज बिलात महिन्याला ३० ते ३२ हजार रुपयांची बचत होत आहे.

एसटी महामंडळाचा सोलार उर्जा प्रकल्प

एसटी महामंडळ मुख्यालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसाला १५० युनिट वीज मिळते. या प्रकल्पासाठी शासनाकडून ५० टक्के सबसिडी महामंडळाला मिळाली आहे. सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सेकी) एमएनआरइ अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येतोय. प्रत्येक राज्यासाठी अशा तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाच उद्घाटन १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आले आहे. यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर एसटी मुख्यालय इमारत व परिसरातील ३ इमारतीच्या विजेसाठी वापर केला जातो. मुंबईनंतर पुण्यातील एसटी कार्यालयाच्या इमारतीवर हा प्रकल्प राबविला आहे. यानंतर, इतर डेपो आणि जिल्हा पातळीवरील इमारतीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

Intro:ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत विविध शासकीय इमारतींवर हरित ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतोय. मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या वीज बिलात महिन्याला
30 ते 32 हजार रुपयांची बचत होत आहे.Body:15 ऑगस्ट 2018 ला या सौर ऊर्जा प्रकल्पाच उदघाटन करण्यात आलं आहे. यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा एसटी मुख्यालय इमारत व एसटीच्या परिसरात तीन इमारतीच्या विजेसाठी वापर केला जातोय. मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्यालयानंतर एसटीने पुण्यातील एसटी कार्यालयाच्या इमारतीवर हा प्रकल्प राबविला असून इतर डेपो व जिल्हा पातळीवर इमारतीवर हा प्रकल्प राबविण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे.
एसटी महामंडळ मुख्यालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून
दिवसाला 150 युनिट मिळते. या प्रकल्पासाठी शासनाकडूनही 50 टक्के सबसिडी एसटी महामंडळाला मिळाली आहे.Conclusion:सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सेकी)
एमएनआरइ अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येतोय. प्रत्येक राज्यासाठी अशी तज्ञ नेमणूक केली आहे. लवकरच हा प्रकल्प सर्व राज्यातील एसटीच्या इमारतींवर सुरू करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.