ETV Bharat / state

कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरुन घसरली; मध्य रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द - रेल्वे

लोकलचा वेग कमी होता. त्यामुळे रुळावरुन घसरल्यानंतरही प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, या घटनेनंतर मध्य रेल्वेच्या ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

कुर्ला रेल्वे स्थानकात लोकल रुळावरुन घसरली
author img

By

Published : May 26, 2019, 10:35 PM IST

Updated : May 26, 2019, 11:56 PM IST

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर आज रात्री ९ वाजता लोकल रुळावरुन घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मध्य रेल्वेची वाहतुक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. जवळपास ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

  • ११.०० - अप धीम्या मार्गावरील वाहतुक ठप्प
  • १०.४५ - सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
  • १०.२० - मध्य रेल्वेकडून ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द होण्याची शक्यता
  • १०.०० - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • ९.३० - प्रवाशांची मोठी गैरसोय
  • ९.१५ - रेल्वे प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू
  • ९.०० - कुर्ला रेल्वे स्थानकात लोकल रुळावरुन घसरली, कोणतीही जीवितहानी

लोकलचा वेग कमी होता. त्यामुळे रुळावरुन घसरल्यानंतरही प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. लोकल घसरल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ मदतकार्य हाती घेतले आहे. या घटनेमुळे काही काळ लोकलसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना पायी प्रवास करावा लागला.

आज रविवार असल्याने दुपारपर्यंत मेगाब्लॉक होता. त्यानंतर, आता लोकल घसरल्यामुळे मध्य रेल्वेचे रात्रीचे वेळापत्रक कोलमडले आहे. लवकरच लोकल सेवा पूर्ववत होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

Intro:मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी रात्री पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज रात्री 9 वाजताच्या सुमारास कुर्ला फलाट क्रमांक 3 वर लोकल रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.Body:ही घटना कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक 3च्या धीम्या मार्गावर झाली. रात्रीची वेळ असल्याने वाहतूक रहदारी कमी होती. या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ मदतकार्य हाती घेतले. तोपर्यंत प्रवाशांनी लोकलमधून उतरून पायी प्रवास केला. या घटनेमुळे काही काळ लोकल सेवा ठप्प झाली होती. सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्याने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.Conclusion:आज रविवार असल्याने दुपारपर्यँत मेगाब्लॉक होता. त्यानंतर रात्री हा प्रकार घडल्याने मध्य रेल्वेचे रात्रीचे वेळापत्रक कोलमडले. लोकलचे एक चाक रुळावरून घसरले होते, यात कोणीही जखमी झाले नाही. लवकरच लोकल सेवा पूर्ववत सुरू होईल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
Last Updated : May 26, 2019, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.