मुंबई - काही दिवसांपूर्वी सीएसएमटी परिसरात पूल कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर, काही जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच पुल ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानिमित्ताने सरकारचा दुर्लक्षपणा देखील उघडकीस आला होता.
सरकार यावर आम्ही पुलांचे ऑडिट करतो ते सुरक्षित आहेत, असे सांगते. परंतु, माटुंगा रोड परिसरात स्टेशन पासून जोडलेल्या पुलापर्यंत येण्यासाठी एक पुल आहे. त्याला मोठी चीर पडली आहे. या पुलाचे ऑडिट झाले, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, मोठी चीर पुलाला पडली आहे. यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. प्रवासीही जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहे. पुलाच्या मध्यभागी असलेल्या चीरेवर रेल्वे प्रशासन किंवा महानगरपालिका का लक्ष देत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड अंधेरी पूल दुर्घटनेनंतर, माटुंगा रोड माटुंगा फ्लायओव्हरशी जोडणारा हा निमुळता ब्रिज ऑडिटसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही दिवसानंतर तो दुरुस्त केला आहे, असे सांगून पुन्हा चालू करण्यात आला. मात्र, त्यानंतरही हा पूल वापरणारे शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून पूलावरुन जात आहेत. चीर गेलेल्या भागाच्या आसपास असताना पुल हलल्यासारखे होते. या पुलाला कडेला वाळलेले गवत आहे. यातून पुलाची किती दुरावस्था झाली आहे हे दिसून येत आहे.