मुंबई - नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी अग्निशमन दलातील जवान लावतात. त्याच्या समस्यानिवारण्यासाठी कोणत्याही स्तरावर प्रश्न मांडावे लागल्यास त्या ठिकाणी प्रश्न मांडू तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊ असे आश्वासन एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिले.
वारिस पठाण कर्मचाऱ्यांना भेट दिली. यावेळी ते म्हणाले, जे जवान दिवस रात्र नागरिकांचे जीव वाचवतात त्यांना गेल्या ९ वर्षात साधे गमबूट भेटत नाहीत. ते कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पैशांनी विकत घ्यावे लागतात. या कर्मचाऱ्यांना ७५० रुपये शिलाई भत्ता दिला जातो यात ५ जोडी कपडे शिवण्यास सांगण्यात येतात. आजच्या महागाईच्या दिवसात इतक्या किमतीत ५ जोडी कपडे शिवून भेटतात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. प्रशासनाला याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र अद्याप न्याय मिळत नाही. पुरेशी यंत्र सामुग्री नसताना जवान काम करत आहेत, त्यांना सोयी सुविधाही दिली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन या संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रशासनाविरोधात लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आम्हाला हे प्रश्न घेऊन नागरिकांमध्ये जावे लागेल असा इशारा रमाकांत बने यांनी दिला.काय आहेत मागण्या --- वेतनाच्या १० टक्के सेवा निवासस्थानाचे अतिरिक्त भाडे १९९१ पासून पूर्वलक्षीप्रमाणे वसूल करणे.- ई मस्टर प्रणालीत नोंदविलेल्या उपस्थितीप्रमाणे वेतनाचे परिगणन करणे.- परीक्षणाच्या नियमावलीत केलेला बेकायदेशीर बदल- गमबुट देण्याबाबत अनास्था- नवनियुक्त अग्निशमकांना पीपीई गणवेश देण्याबाबत- कालबाह्य पदोन्नती- अतिरिक्त कामांचा भत्ता मिळावा