ETV Bharat / state

अर्ध्या महाराष्ट्रात खोळंबल्या खरीपाच्या पेरण्या - डॉ.अनिल बोंडे

आतापर्यंत खरीपाच्या ७५ टक्के पेरण्या अपेक्षित असताना राज्यात अवघ्या 54 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jul 18, 2019, 12:31 PM IST

डॉ.अनिल बोंडे

मुंबई- कोकण-मुंबईसह पुणे व आसपासच्या भागात गेल्या आठवडाभर पावसाचा जोर कायम असताना महाराष्ट्रातील १६० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील शेतकरी खरीपाच्या पेरण्यांसाठी खोळंबल्याचे चित्र आहे. आतापर्यंत खरिपाच्या ७५ टक्के पेरण्या अपेक्षित असताना राज्यात अवघ्या 54 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.

राज्यात खरीपाच्या 80.61 लाख हेक्टर क्षेत्रावर (54 टक्के) पेरणी झाली असून 92 तालुक्यात 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सुमारे 17 जिल्ह्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला असून सात जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे बोंडे यांनी सांगितले.

डॉ.अनिल बोंडे

गेले वर्ष दुष्काळात गेले. जूनच्या अखेरीस पावसाने कोकणात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता जुलैचे १० दिवस उलटून गेले तरी मराठवाड्याच्या बहुतांश भागासह राज्यातील १६० तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर १९४ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील खरीपाच्या पेरण्यांचे प्रमाण अवघे 54 टक्केच आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र पेरण्यांसाठी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कोकण वगळता त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तेथील पेरण्यांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना कृषी मंत्री म्हणाले, राज्यात 12 जुलैपर्यंत 379 मिमी पाऊस झाला आहे. राज्याच्या 355 तालुक्यांपैकी 28 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, 137 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 98 तालुक्यात 75 ते 100 टक्के आणि 92 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 149.74 लाख हेक्टर क्षेत्र असून 80.61 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण व पुणे विभागात अनुक्रमे 36 हजार 355.29 हेक्टर तर 4 हजार 929.07 हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत. राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

कोकण विभागात 47 तालुक्यांपैकी 2 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. कोकण विभागात 4.61 लाख हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी 1.19 लाख हेक्टर (26 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात एकूण 40 तालुक्यांपैकी 4 तालुक्यात 25 ते 50 टक्के, 16 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 11 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के तर 9 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नाशिक विभागात खरीप पिकाच्या 21.31 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 13.54 लाख हेक्टर (64 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात खरीप पिकाच्या 7.11 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 2.85 लाख हेक्टर क्षेत्रावर (40 टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीप पिकाखालील 8.16 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 4.05 लाख हेक्टर क्षेत्रावर (50 टक्के) पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात खरीपाचे क्षेत्र 20.15 लाख हेक्टर असून 14.45 लाख हेक्टर क्षेत्रावर (72 टक्के) पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरीप पिकाचे क्षेत्र 27.87 लाख हेक्टर असून त्यापैकी 12.59 लाख हेक्टर क्षेत्रावर (45 टक्के) पेरणी झाली आहे. अमरावती विभागात 32.31 लाख हेक्टर क्षेत्र खरीपाचे असून 23.77 लाख हेक्टर क्षेत्रावर (74 टक्के) पेरणी झाली आहे. नागपूर विभागात खरीप पिकाचे क्षेत्र 19.18 लाख हेक्टर असून त्यापैकी 7.88 लाख हेक्टर क्षेत्रावर (41 टक्के) पेरणी झाली आहे.

ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, गोंदिया आणि चंद्रपूर या 10 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.

Intro:MH_MUM_02_PERANI__MIN_ DR_BONDE_VIS_MH7204684 Body:MH_MUM_02_PERANI__MIN_
DR_BONDE_VIS_MH7204684

निम्म्या महाराष्ट्रातील शेतकरी खरिपाच्या पेरण्यांसाठी खोळंबला

- डॉ.अनिल बोंडे

मुंबई :कोकण-मुंबईसह पुणे व आसपासच्या भागांत गेला आठवडाभर पावसाचा जोर कायम असताना महाराष्ट्रातील १६० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील शेतकरी खरिपाच्या पेरण्यांसाठी खोळंबले आहेत. आतापर्यंत खरिपाच्या ७५ टक्के पेरण्या अपेक्षित असताना राज्यात अवघ्या 54 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

राज्यात खरीपाची 80.61 लाख हेक्टर क्षेत्रावर (54 टक्के) पेरणी झाली असून 92 तालुक्यांत 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सुमारे 17 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाला असून सात जिल्ह्यांमध्ये 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
गेले वर्ष दुष्काळात गेले. जूनच्या अखेरीस पावसाने कोकणात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता जुलैचे १० दिवस उलटून गेले तरी मराठवाडय़ाच्या बहुतांश भागासह राज्यातील १६० तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर १९४ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाण अवघे 54 टक्केच आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र पेरण्यांसाठी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कोकण वगळता त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तेथील पेरण्यांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना कृषी मंत्री म्हणाले, राज्यात 12 जुलैपर्यंत 379 मिमी पाऊस झाला आहे. राज्याच्या 355 तालुक्यांपैकी 28 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, 137 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 98 तालुक्यांत 75 ते 100 टक्के आणि 92 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 149.74 लाख हेक्टर क्षेत्र असून 80.61 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण व पुणे विभागात अनुक्रमे 36 हजार 355.29 हेक्टर तर 4 हजार 929.07 हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहे. राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

कोकण विभागात 47 तालुक्यांपैकी 2 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. कोकण विभागात 4.61 लाख हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी 1.19 लाख हेक्टर (26 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात एकूण 40 तालुक्यांपैकी 4 तालुक्यांत 25 ते 50 टक्के, 16 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 11 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के तर 9 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नाशिक विभागात खरीप पिकाच्या 21.31 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 13.54 लाख हेक्टर (64 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात खरीप पिकाच्या 7.11 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 2.85 लाख हेक्टर क्षेत्रावर (40 टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीप पिकाखालील 8.16 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 4.05 लाख हेक्टर क्षेत्रावर (50 टक्के) पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात खरीपाचे क्षेत्र 20.15 लाख हेक्टर असून 14.45 लाख हेक्टर क्षेत्रावर (72 टक्के) पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरीप पिकाचे क्षेत्र 27.87 लाख हेक्टर असून त्यापैकी 12.59 लाख हेक्टर क्षेत्रावर (45 टक्के) पेरणी झाली आहे. अमरावती विभागात 32.31 लाख हेक्टर क्षेत्र खरीपाचे असून 23.77 लाख हेक्टर क्षेत्रावर (74 टक्के) पेरणी झाली आहे. नागपूर विभागात खरीप पिकाचे क्षेत्र 19.18 लाख हेक्टर असून त्यापैकी 7.88 लाख हेक्टर क्षेत्रावर (41 टक्के) पेरणी झाली आहे.

ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, गोंदीया आणि चंद्रपूर या 10 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.