मुंबई - डोंगरी इमारत दुर्घटने प्रकरणी सोमवारी मुंबई पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी पालिकेच्या "बी" वॉर्डचे प्रभारी सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित केले आले.
बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पुरावे दाखवत डोंगरी येथे घरांवर बांधकाम करून अनधिकृत इमारती उभ्या राहत असल्याचे दाखवले होते. त्यावर पालिका आयुक्तांनी 24 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. केसरबाई इमारत दुर्घटनेमध्ये १३ जन दगावले होते. या इमारत दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांप्रकरणी पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.