ETV Bharat / state

टिक-टॉकद्वारे पोलिसांना आव्हान देणारा अभिनेता एजाज खानला सायबर पोलिसांनी केली अटक

हत्येचा बदला घेतला तर मुसलमान दहशतवादी आहे, असे म्हणू नका, असा व्हिडिओ एजाज खानने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

अभिनेता एजाज खान
author img

By

Published : Jul 18, 2019, 5:02 PM IST

Updated : Jul 18, 2019, 7:27 PM IST

मुंबई - टिक-टॉकच्या माध्यमातून मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत एक व्हिडिओ अभिनेता एजाज खानने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याप्रकरणी एजाज खानला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

समाज माध्यमांवरील टिक-टॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या इतर ४ सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तबरेझ अन्सारीची हत्या केली होती. पण त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान दहशतवादी आहे, असे म्हणू नका, असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या संदर्भात मुंबईच्या एल.टि.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात या आरोपीना अटक केली जाणार आहे. मात्र, यापूर्वीच एजाज खान याने हा व्हिडिओ पोस्ट करून पोलिसांना आव्हान दिले होते, त्यामुळे एजाज खान याला अटक करण्यात आली आहे.

टिक-टॉक व्हिडिओ आणि पोलिसांची प्रतिक्रिया

अमली पदार्थ बाळगल्याचा गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वी एजाज खानला नवी मुंबईतील बेलापूर येथून पोलिसांनी अटक केली होती. सध्या एजाज खान हा जामिनावर बाहेर होता. बिकेसी सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Intro:अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी केली अटक केली आहे. टिक टॉक च्या माध्यमातून मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत एक व्हिडिओ एजाज खान ने सोशल माध्यमांवर पोस्ट केला होता.
Body:अमली पदार्थ बाळगल्याचा गुन्ह्यात काही महिन्यांआगोदर एजाज खानला नवी मुंबईतील बेलापूर येथून पोलिसांनी अटक केली होती. सध्या एजाज खान हा जामिनावर बाहेर सुटला होता. बिकेसी सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Conclusion:समाज माध्यमांवरील टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तबरेझ अन्सारीची हत्या केली पण त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहे असं म्हणू नका अश्या आशयाचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर पोस्ट केला होता. या संदर्भात मुंबईच्या एल टि मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या संदर्भात या आरोपीना अटक केली जाणार आहे. मात्र त्या आगोदरच एजाज खान याने हा व्हिडीओ पोस्ट करून पोलिसांना आव्हान दिल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
Last Updated : Jul 18, 2019, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.