बुलडाणा : तरुण-तरुणीने (Youth Commits Suicide With Minor Girl) गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान शेगाव नागझरी लोहमार्गावर विदर्भ एक्सप्रेससमोर पुढे येऊन आत्महत्या (Couple Suicide in front of train Shegaon) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुण हा संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील अजय संजय मोरखडे आणि मुलगी ही त्याच परिसरातील असून ती 14 वर्षांची असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. (latest news from Buldana) (Shegaon Couple Suicide)
शेगाव परिसरात खळबळ - शेगाव रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता गोंदियावरून मुंबई जाणारी विदर्भ एक्सप्रेस शेगावकडे येत होती. त्यावेळी शेगाव नागझरी दरम्यानच्या लोहमार्गावर अल्पवयीन तरुणी व सज्ञान तरुणाने आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. मृतांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसासमोर होते. मात्र, मृतक कवठा गावातील असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्पवयीन तरुणीचाही पत्ता पोलिसांनी काढला. या घटनेमुळे शेगाव परिसरात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. (Buldana Crime)
आत्महत्येचे कारण अज्ञात - दरम्यान, या दोघांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस या घटनेचा तपास करीत आहे. आज या दोघांचेही मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले असल्याचे समजते. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.