बुलडाणा - बुलडाण्याच्या खामगावात सैराट चित्रपट मधील कृत्य झाल्याचे मंगळवारी रात्री समोर आले. काही महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केल्याने सतीफैल मध्ये राहणाऱ्या युवकावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी ( Knife Attack on Youth in Buldana ) करण्यात आले. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालय आणि नंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे युवकावर हा खामगावच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोरच हल्ला करण्यात आला आहे. ज्या युवकावर हल्ला करण्यात आला आहे त्याचा नाव अमन उर्फ रघु तिवारी आहे. खांमगावात झालेल्या सैराट घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पळून जावून केला होता विवाह -
सतीफैल भागातील रहिवाशी राहणाऱ्या अमन आणि एका मुलीने प्रेम प्रकरणातून पडून गेले होते. मुलीकडील नातेवाईकांनी मुलगी पळून जाण्याची तक्रार शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. दरम्यान मंगळवारी 4 जानेवारीला अमन आणि ती मुलगी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हजर होवून मर्जीने लग्न केल्याचे पोलिसांना जबाब दिला.
शिवाजी नगर पोलीस स्टेशनसमोर तरूणावर हल्ला -
त्यावेळी याची माहिती काही मंडळींना मिळाली असता त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाहेर येऊन अमनशी वाद घातला व ऑटो मध्ये बसलेला अमन विजय तिवारी वय २६ ह्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी जखमी अवस्थेत युवकाला प्रथम उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरीता अकोला येथे हलविण्यात आले.
तक्रारीवरून गुन्हे दाखल -
हल्ला प्रकरणी युवकाच्या आई ज्योती तिवारी यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशन दिलेल्या तक्रारीवरुन रविद्र बोंद्रे, गणेश जाधव, विजय जाधव, गणेश कोमुकर, आकाश धुरंदे, रोहित धुरंदे, आम बोर्ड, कुणाल बोंद्रे, सनी चव्हाण, अमन चव्हाण, वैभव किर्तनकार, महादेव फंड, गोपाल जाधव व इतर चार जणांविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
हेही वाचा - Kalicharan Maharaj Custody Of Pune Police : कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात