ETV Bharat / state

'इथे आले, मंत्रीपद गेले', शेगावची आख्यायिका खरी ठरणार?

शेगावची आख्यायिका बाबत राजकारणात झालेली उलथापालथ पाहता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. कारण मुख्यमंत्री पदावर असणार व्यक्ती येथे आली की त्याचे पद जाते, असा योगायोग येथे आल्यावर घडत आहे. आत्तापर्यंत चार मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असे घडले आहे.

'इथे आले, मंत्रीपद गेले'
author img

By

Published : Nov 12, 2019, 12:07 AM IST

बुलडाणा - संत नगरी असलेल्या शेगावची अख्यायिका खरी ठरणार का? हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शेगावामध्ये संत गजानन महाराजांचे वास्तव्य असल्याने राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून दररोज हजारो भक्त येथे माथा टेकूण आपल्या इच्छा आकांशा व्यक्त करतात. या भाविकांमध्ये राजकीय मंडळींची संख्याही कमी नाही. मात्र, राजकारणातील एक पद असे आहे की, तो पदाधिकारी येथे आला तर त्याचे पद कुठल्या ना कुठल्या कारणाने जातेच. असा समज आता मागील इतिहास पाहता दृढ होत चालला आहे.

शेगावची आख्यायिका बाबत राजकारणात झालेली उलथापालथ पाहता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेचे मुख्य कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आचारसंहीता लागू होण्यापूर्वी शेगावात पोहोचून गजानन महाराजांचे दर्शन घेतले होते. येथे झालेल्या सभेत 'मी पुन्हा येईल' अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली होती. मात्र, आज त्यांच्या मुख्यमंत्री पदावर संकट कोसळल्याचे चित्र दिसत आहे.

शेगावला काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला देवंद्र फडणवीस आले होते. पण ऐनवेळी व्यस्त शेड्यूल्डचे कारण समोर करून शेगावला येण्याचे टाळले होते. मात्र, समज गैरसमज काहीही असले तरी जनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस शेगावला आले. मात्र, ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात येताच होताच भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यामुळे शेगावला पोहोचण्याआधीच जनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा ही यात्रा याच जिल्ह्यातून सुरु होणार होती. ज्या दिवशी ही यात्रा सुरु झाली त्याच दिवशी भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन झाले होते. तेव्हा नांदुऱ्यावरून ही यात्रा शेगावात पोहोचली. शेगावमधील सभेत कुठलेही राजकीय भाषण न करता मी पुन्हा येईल असे सांगून फडणवीस निघून गेले. आणि तेव्हापासूनच चर्चेला उधाण आले की, फडणवीस आता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार नाहीत.

शेगावमध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचे पद जाते ही परंपरा अनेकदा खरी ठरलेली आहे. मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी हे १९९८ साली शेगाव येथे आल्यानंतर त्यांचे लगेच पद गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर असणारा व्यक्ती शेगावमध्ये येण्याचे धाडस करत नाही. असे असतांना मुख्यमंत्री फडणवीस हे शेगावमध्ये आले होते.

काय झाले आहे आतापर्यंत?

याआधी 3 मुख्यमंत्र्यांसह एका राज्यपालांचे शेगावमध्ये आल्यानंतर पद गेलेले आहे. यामध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे १९८६ साली शेगावला बसस्थानकाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यानंतर काही दिवसातच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना शेगावला आले होते. त्यानंतर त्यांचेही पद गेले होते. 1995 साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना शेगावला आले आणि खामगांव येथे जाहीर सभा घेवून परत गेले. त्यानंतर काँग्रेसचे सरकार पडले आणि पवारांच्या जागी मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचे मनोहर जोशी विराजमान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी १९९८ साली शेगावमध्ये आले आणि मुंबईत गेल्यानंतर त्यांच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणे यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती केली. अशा प्रकारची शेगावची आख्यायिका आहे.

१९९८ नंतर मुख्यमंत्री पदावरील कोणीही शेगावला आले नसल्याचे बोलले जाते. अनेकजण खामगांवपर्यंत आले परंतू, शेगावला आले नाहीत. ही बाबही राजकीय वर्तुळात सर्वांना माहीत आहे. भाजपच्या नेत्यांनासुध्दा याची चांगली कल्पना आहे. मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा विदर्भातीलच असल्याने व विरोधी पक्षात असताना ते शेगावला बऱ्याचदा येऊन गेले आहेत. कदाचीत मुख्यमंत्री फडणवीस यांना शेगावला आल्यानंतर पद जाण्याचा इतिहास चांगल्या प्रकारे माहीत असेलही. तरीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेगावला येण्याचे धाडस केले होते.

Intro:Body:Mh_bul_story of Shegaon will come true _10047

Story ; *शेगावची आख्यायिका खरी ठरणार ?*

"जो आला तो गेला" ची आहे अख्यायिका

*तीन मुख्यमंत्र्यांसह एका राज्यपालांचे गेले आहे पद*

देवेन्द्र फडणवीस होऊ शकतात चौथे मुख्यमंत्री

*बुलडाणा* : 'जो आला तो गेला' ची अख्यायिका शेगाव शहराची असतांना आणि तशी चर्चा प्रसिद्धी माध्यमाधे सुरु असतांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शेगाव शहरात येऊन दाखविले. दाखविलेच काय तर "मी पुन्हा येईल" अशी घॊष्णा हि करून टाकली. मात्र सुरु असलेली राजकीय उलटफेर पाहता आला तो गेला ची आख्यायिका खरी ठरते कि काय ? असा शंका सध्या निर्माण झाली आहे.
संत नगरी शेगावात संत गजानन महाराजांचे वास्तव्य असल्याने राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशभरातून दररोज हजारो भक्त गण श्री चरणी माथा टेकुण आपल्या इच्छा आकांशा पूर्ण करून घेतात हि लाखो भाविकांची श्रद्धा आहे. या भाविकांमध्ये राजकीय मंडळींची संख्याही कमी नाही. मात्र राजकारणातील एक पद असा आहे कि, तो पदाधिकारी येथे आला तर त्याच पद नक्कीच कुठल्या ना कुठल्या कारणाने जाते. असा असलेला समज आता मागील इतिहास पाहता दृढ होत चालला आहे.आणि या शेगावच्या आख्यायिका बाबत राजकारणात झालेली उलथापालथ पाहता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. आणि या चर्चेचे मुख्य कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शेगावात पोहचून श्रींचे दर्शन घेतले आणि झालेल्या सभेत "मी पुन्हा येईल" अशी घोषणा सुद्धा केली. आणि आज त्यांच्या मुख्यमंत्री पदावर संकट कोसळले. त्यांच्यावरच काय संपूर्ण पक्षावर संकट कोसळले.
मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यावर देवेंद्र फडणवीस सुरूवातीच्या काळात खामगांव व जळगाव जा येथे आले होते तेव्हा तसेच शेगावला काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला ते येतील असे सांगितले जात होते. पण ऐनवेळी व्यस्त शेड्यूल्ड चे कारण समोर करून शेगावला येण्याचे टाळलेले आहे. समज गैरसमज काहीही असले तरी जनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस शेगावला आले. मात्र हि यात्रा बुलढाणा जिल्ह्यात सामील होताच भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे शेगावला पोहचण्याआधीच जनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा हि यात्रा याच जिल्ह्यातून सुरु होणार होती. अन ज्या दिवशी हि यात्रा सुरु झाली त्याच दिवशी भाजपा नेते अरुण जेटली यांचे निधन झाले. तेव्हा नांदुऱ्यावरून हि यात्रा शेगावात पोहचणार होती. मग काय शेगावातच्या सभेत कुठलेही राजकीय भाषण न करता मी पुन्हा येईल असे सांगून फडणवीस निघून गेले. आणि तेंव्हाच पूचा चर्चा सुरु झाली कि फडणवीस आता मुख्यमनातरी म्हणून येणार नाही याची....
शेगाव शहरात मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचे पद जाते ही परंपरा अनेकदा खरी ठरलेली आहे. मुख्यमंत्री असतांना मनोहर जोशी हे 1998 साली शेगाव येथे आल्यानंतर त्यांचे लगेच पद गेले होते. त्यामुळे कोणत्याही मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीने त्यांनतर शेगाव येण्याचे धाडस केलेले नाही. असे असतांना मुख्यमंत्री फडणवीस हे शेगाव शहरात आले होते.

*चौकट -*

. *काय झालेलं आहे आतापर्यंत ?*

मुख्यमंत्री शेगावला आल्यावर नेमके काय होते याबाबतचे समज-गैरसमजासंदर्भात सांगायचे झाल्यास या आधी तीन मुख्यमंत्र्यांसह एका राज्यपालांचे शेगावी आल्या नंतर त्यांचे पद गेलेले आहे. यामध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे 1986 साली शेगावला बसस्थानकाच्या उद्घाटनासाठी आले आणि काही दिवसातच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले. ए.आर. अंतुले हे शेगावला आले आणि पद गेले. त्यानंतर 1995 साली शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री असतांना शेगावला आले आणि खामगांव येथे जाहीर सभा घेवून परत गेले. त्यानंतर काँग्रेसचे सरकार पडले आणि पवारांच्या जागी मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचे मनोहर जोशी विराजमान झाले. नंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी 1998 साली शेगावी आले आणि मुंबईत गेल्यानंतर त्यांच्या जागेवर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची नियुक्ती केली. एव्हडेच नव्हे तर गोव्याचे चे राज्यपाल तर दर्शन घेत असतांनाच पाय उतार झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला होता. अशाप्रकारची शेगावची आख्यायिका असतांना आणि त्याला अनूसरून 1998 नंतर मुख्यमंत्री पदावरील कोणीही शेगावला आले नसल्याचे बोलल्या जाते. अनेकजण खामगांवपर्यंत आले परंतू शेगावला आले नाहीत. ही बाबही राजकीय वर्तुळात सर्वांना माहित आहे. भाजपाच्या नेत्यांना सुध्दा याची चांगली कल्पना आहे. मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा विदर्भातीलच असल्याने व विरोधी पक्षात असतांना ते शेगावला बरेचदा येऊन गेल्याने कदाचित मुख्यमंत्री शेगावला आल्यानंतर पद जाण्याचा इतिहास त्यांनाही चांगल्याप्रकारे माहित असेलही. तरीही मुख्यमंत्र्यांनी शेगाव येण्याचा पक्का निर्धार करून देवेंद्र फडणवीस यांच्या हिंमतची दादच द्यावी लागेल.

- *फहीम देशमुख, शेगाव*
---------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.