बुलडाणा - शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अ़डविल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करू, असा इशारा, आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. तसेच गुन्हेही दाखल करण्यात येतील असेही आमदार गायकवाड म्हणाले आहेत.
खरीप हंगामाकरीता काही बँका शेतकर्यांना पीक कर्ज देत नाहीत. अनेक शेतकर्यांना आवश्यक नसलेल्या कागदपत्रांची पुर्तता करावयास सांगत आहे. अनेक शेतकर्यांचे कर्ज माफी झाले नाही, अशा तक्रारी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे प्राप्त प्राप्त झाल्या होत्या.
यानंतर आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी डोंगरखंडाळा व पाडळी येथील सेंन्ट्रल बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना शेतकर्यांना पिक कर्जाकरीता विनाकारण त्रास देऊ नका. शासनाने 22 मे रोजी आदेश काढुन ज्या शेतकर्यांचे नाव कर्ज माफीच्या यादीत आले असेल आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल अशा शेतकर्यांचे कर्ज माफी झाले असे समजुन त्यांना सुध्दा कर्ज देण्यात यावे, असे आदेश दिलेले आहे.
या संदर्भात कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सचिवाशी चर्चा झाली आहे. ज्या शेतकर्यांचे कर्ज माफी झाली नाही आणि त्यांचे आधार प्रामाणिकरण बँकेत झाले नाही. अशा शेतकर्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बँकेच्या अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी शेतकर्यांना विनाकारण कागदपत्रांकरिता त्रास देऊ नये. पेरणीकरीता सर्वच शेतकर्यांना कर्जाची गरज आहे. त्यामुळे त्यांचे कर्ज तत्काळ मंजूर करावे, असेही ते म्हणाले.
तसेच जे अधिकारी विनाकारण शेतकर्यांना त्रास देतील त्यांच्यावर कडक कार्यवाही करून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशाराही आमदार गायकवाड यांनी दिला. यावेळी डोंगरखंडाळा येथे बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे, लीड बँक मॅनेजर मनावर, दुय्यम निबंधक सांगळे, नायब तहसिलदार पवार, सरपंच किशोर चांडक, धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्यूंजय गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, ओमसिंग राजपूत, स्वीय सहायक अनुप श्रीवास्तव, नितीन राजपूत, चंद्रकांत बर्दे, नयन शर्मा उपस्थित होते.