ETV Bharat / state

बुलडाण्यात शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आठवड्याच्या शेवटी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश जारी केले. तसेच सर्व प्रकारच्या बाजारपेठ सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सुरू राहणार आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी-रविवारी असणार कडक लॉकडाऊन
will be strict lockdown in buldana district on saturday sunday
author img

By

Published : Feb 28, 2021, 6:55 AM IST

Updated : Feb 28, 2021, 9:29 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या बाजारपेठ सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सुरू राहणार आहेत. दरम्यान, या लॉकडाऊनला नागरिकांच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

प्रतिनिधीचा रिपोर्ट

लॉकडाऊनमध्ये हे राहणार सुरू -

या लॉकडाऊनदरम्यान जिल्ह्यात दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 तसेच सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत नियमितपणे सुरू असतील. सोबतच औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एसटी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील.

प्रतिक्रिया

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई -

या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. हा आदेश प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 पासून व प्रतिबंधीत क्षेत्र नसलेल्या ठिकाणी सायंकाळी 5 पासून ते 1 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत कडक लॉकडाऊन लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - भरतपूरच्या स्थापनेचा साक्षीदार 'अभेद्य लोहगड' किल्ला

Last Updated : Feb 28, 2021, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.