बुलडाणा - आदिवासी पाड्यावर रानडुकराची शिकार करून मासाची विक्री करणाऱ्या आरोपीला वन विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. संग्रामपूर तालुक्यातील जळगाव जामोद येथील वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - 'बाहुबली' फेम राजमौलींच्या नव्या सिनेमाने शूटिंग पूर्ण होण्याआधीच कमावले ४०० कोटी!
कालू तेहरसिंग अहेऱ्या असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मासासह शिकारीचे साहित्य आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा - कोरोनाचा 'स्मार्टफोन'ला विळखा; देशातील उद्योगावर परिणाम होण्याची भीती
आदिवासी पाड्यावर रानडुकराच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची चर्चा परिसरात होती. या माहितीच्या आधारे जळगाव जामोद वन विभागाच्या उपवन परिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या घरी छापा टाकला होता. या आरोपीविरोधात वन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.