बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात शासनाकडून गोरगरीबांची उपासमार होऊ नये, यासाठी धान्य वाटप केले जात आहे. मात्र, रेशन दुकानदारांनी धान्य वाटपांमध्ये भ्रष्टाचार करू नये. असे केल्यास गुन्हे दाखल करू, अशा इशारा बुलडाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बिल्हाळे यांनी रेशन दुकानदारांना दिला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यानुसार गुन्हे करण्याचा इशारा बिल्हाळे यांनी दिला आहे.
हेही वाचा... #CoronaLockdown : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून बंद...
लॉकडाऊनच्या काळात काही रेशन दुकानदारांकडून गरीबांचे धान्य शासकीय नोंदवहीत स्वीकृत केल्याची नोंद केली जाते. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना त्यांचे धान्य देत नाहीत किंवा त्यांच्या रेशनकार्डवर जितके प्रमाणात धान्य मिळायला हवे, त्यापेक्षा कमी धान्य देतात. अशा अनेक तोंडी अथवा लेखी तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे येत आहेत. अशा रेशनदुकांदार यापुढे कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बिल्हाळे यांनी दिले आहेत.