ETV Bharat / state

सिंदखेड राजा, लोणार नगरपालिकेसाठी शांततेत मतदान - lonar

जिल्ह्यात लोणार व सिंदखेड राजा नगर पालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. दोन्ही नगर पालिकांमध्ये जनतेद्वारे नगराध्यक्षाची निवड होणार आहे.

मतदान
author img

By

Published : Mar 25, 2019, 3:43 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात लोणार व सिंदखेड राजा नगर पालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. दोन्ही नगर पालिकांमध्ये जनतेद्वारे नगराध्यक्षाची निवड होणार आहे.

या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. मतदान शांततेत पार पडले. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. अंदाजे आकडेवारीनुसार सिंदखेड राजा नगरपालिकेसाठी सायं ५.३० वाजेपर्यंत ७८.९४ टक्के व लोणार नगर पालिकेसाठी ७२.७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

सिंदखेडराजा येथे थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपा युतीकडून सतीश भागोजी तायडे, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवीदास वसंतराव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीच्या सुधाकर चौधरींचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. तर १६ नगरसेवक पदासाठी ३७ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सिंदखेड राजा नगर पालिकेत एकूण १४ हजार ६५ मतदार आहेत. त्यापैकी सायं ५.३० वाजेपर्यंत ११ हजार १०३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७८.९४ आहे.
लोणारमध्ये नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवार असून काँग्रेस-राष्ट्रवादी कडून पूनम पाटोळे , शिवसेना- भाजपा युतीकडून सुनिता राजगुरु, वंचित बहुजन आघाडी कडून मनीषा ज्ञानोबा, रासपकडून सुर्वणा मोरे वाघमारे तर अपक्ष म्हणून अयोध्या पसरटे रिंगणात आहेत. तर १८ नगरसेवकांच्या जागेसाठी ५८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

लोणार नगरपालिकेसाठी एकूण १८ हजार ७३७ मतदार आहेत. त्यापैकी १३ हजार ६३७ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७२.७८ आहे.

दोन्ही नगर पालिकांसाठी २५ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. लोणार येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सभागृहात व सिंदखेड राजा येथे नगर परिषद सभागृहात मतमोजणी पार पडेल.

Intro:Body:स्टोरी:- सिंदखेड राजा व लोणार नगर पालिकेसाठी मतदान शांततेत

सिंदखेड राजा अंदाजीत ७८.९४ व लोणारला ७२.७८ टक्के मतदान

२५ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी

बुलडाणा, दि २४ : जिल्ह्यात लोणार व सिंदखेड राजा नगर पालिका निवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. या दोन्ही नगर पालिकांमध्ये जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला.  मतदान उत्साहात व शांततेत पार पडले. सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. अंदाजीत आकडेवारीनुसार सिंदखेड राजा नगर  पालिकेसाठी सायं ५.३० वाजेपर्यंत ७८.९४ टक्के व लोणार नगर पालिकेसाठी ७२.७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

सिंदखेडराजा येथे थेट नगराध्यक्ष पदासाठी तीन नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना- भाजपा युतीकडून सतिष भागोजी तायडे व काँग्रेस राष्ट्रवादी कडून देवीदास वसंतराव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी सुधाकर चौधरी यांचे तर १६ नगर सेवक पदासाठी ३७ उमेदवारांचे भवितव्य आज २४ मार्च रोजी मतपेटीत बंद झाले आहे. सिंदखेड राजा नगर पालिका क्षेत्रात पुरूष एकूण मतदार ७ हजार २८८ असून स्त्री मतदार ६ हजार ७७७ आहेत. अशाप्रकारे १४ हजार ६५ एकूण मतदार आहेत. त्यापैकी ५ हजार ७३८ पुरूष मतदारांनी व ५ हजार ३६५ स्त्री मतदारांनी सायं ५.३० वाजेपर्यंत मतदान केले. एकूण मतदान केलेल्या मतदारांची संख्या ११ हजार १०३ असून अंदाजीत टक्केवारी ७८.९४ आहे. त्याचप्रमाणे लोणारमध्ये पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून काँग्रेस राष्ट्रवादी कडून मनीष पुनम पाटोळे , शिवसेना- भाजपा युतीकडून सुनिता विष्णु राजगुरु, वंचित बहुजन आघाडी कडून मनीषा ज्ञानोबा,रासपकडून सुजित सुर्वणा मोरे वाघमारे,अपक्ष म्हणून अयोध्या अशोक पसरटे हे निवडणूक लढवित आहे तर १८ नगरसेवकांच्या जागेसाठी ५८ उमेदवार सदस्य पदासाठी उमेदवार रिंगणात आहे.लोणार नगरपालिकेसाठी एकूण पुरूष मतदार ९ हजार ६४७ व ९ हजार ९० स्त्री मतदार आहेत. अशाप्रकारे एकूण स्त्री व पुरूष १८ हजार ७३७ मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार २७२ पुरूष व ६ हजार ३६५ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. अशाप्रकारे एकूण १३ हजार ६३७ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ७२.७८ आहे. या दोन्ही नगर पालिकेसाठी मतमोजणी २५ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. लोणार येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सभागृहात व सिंदखेड राजा येथे नगर परिषद सभागृहात मतमोजणी होणार आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.