ETV Bharat / state

बुलडाण्यातील हिवरा आश्रम येथे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप.. - Vivekananda Janmotsava at Hivara Ashram in Buldhana

राज्यातील सर्वात मोठी प्रसादाची महापंगत हिवरा आश्रमात होत असते. येथे दरवर्षी साजरी करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची या वर्षाची सांगता गुरुवारी प्रसादाच्या महापंगती विना पार पडली. शिवाय यावर्षी विविध कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पाडत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

ऑनलाईन पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप..

author img

By

Published : Feb 5, 2021, 4:34 PM IST

Updated : Feb 17, 2021, 3:18 PM IST

बुलडाणा - राज्यातील सर्वात मोठी प्रसादाची महापंगत हिवरा आश्रमात होत असते. येथे दरवर्षी साजरी करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची या वर्षाची सांगता गुरुवारी प्रसादाच्या महापंगती विना पार पडली. शिवाय यावर्षी विविध कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पाडत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रम लाखो भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पोहचवण्यात आले. 2,3,4 फेब्रुवारी या तीन दिवशी विवेकानंद जन्मोत्सव मर्यादित उपस्थितीत घेण्यात आला. या जन्मोत्सवात महापंगत,यात्रा,मिरवणूक,भजनी दिंड्या आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

ऑनलाईन पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप..
यंदा कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारणदिनांक 2,3,4 फेब्रुवारीला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत मर्यादित उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला. नामवंत प्रबोधनकारांना, कलावंतांना निमंत्रित केले असून त्यांचे कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने प्रसारित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमासाठी व उत्सवासाठी भाविकांनी गर्दी करू नये. घरी राहूनच कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी यंदा व्यासपीठावरून ऑनलार्इन कार्यक्रमात श्रीपाल सबनीस,उत्तम कांबळे,भास्कर पेरे पाटील, चारूदत्त आफळे,पंजाब डख,न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,हरीचैतन्य स्वामी,प्रकाश महाराज जवंजाळ, गजाननदादा शास्त्री, उध्दवराव गाडेकर, संजय महाराज पाचपोर,कृष्णचैतन्यपुरी,संदीपान महाराज यांच्यासह अनेक नामवंत ज्ञानयज्ञात सहभागी झाले होते. तर स्वामीजींचे पूजन, दर्शन भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह करण्यात आले.आव्हानाला लाखों भाविकांचे प्रतिसादविशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे हिवरा आश्रम येथे 2 लाखांच्या वर येणाऱ्या भाविकांनी आश्रमाच्या एका आव्हानाला प्रतिसाद देत हिवरा आश्रम येथे मोठ्या प्रमाणात भाविक पोहचले नाही.आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पोलिसांची मदत घेण्यात आली नाही.म्हणून हिवरा आश्रमाचे नियोजनाचे कौतुक होत आहे.शेवटच्या दिवशी महापंगतविवेकानंद जयंती महोत्सव हा राज्यातील एका मोठ्या कार्यक्रमांपैकी एक असतो. विवेकानंद आश्रम या धर्मादायी संस्थेची स्थापना करणारे निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी सुरू केलेला हा महोत्सव देश विदेशातील लक्षावधी भाविकांच्या श्रध्देचे व आकर्षणाचे केंद्र बनला आहे. देशभरात एवढ्या भव्य प्रमाणात संपन्न होणारी स्वामीजींची जयंती केवळ बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील प.पू.शुकदास महाराज आश्रमातच संपन्न होत असल्याचे पाहायला. तीन दिवस नामवंतांची व्याख्याने, प्रवचने व प्रबोधनाचे कार्यक्रम हे या उत्सवाचे महत्वाचे वैशिष्टे असते. शेवटच्या दिवशी लाखो भाविकांना अन्नदानाचा सोहळा डोळयाचे पारणे फेडणारा असतो. जवळपास दोन लाख भाविक, दोन हजार स्वयंसेवक, महाप्रसादांनी भरलेली शंभर ट्रॅक्टर व वीस मिनिटांचा कालावधी तसेच धर्म,पंथ,संप्रदाय विरहीत मानव समाजाचे सामुदायिक दर्शन हे या सोहळ्याचे विलक्षण वैशिष्ट असते. सुयोग्य नियोजन,भाविकांनी पाळलेली शिस्त,प्रशासनाचे सहकार्य त्यामुळे ही महापंगत चर्चेचा विषय ठरलेली आहे.मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे प्रसादाची महापंगत रद्द करण्यात आली.

Last Updated : Feb 17, 2021, 3:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.