बुलढाणा - खामगाव व परिसरातील विठ्ठल भक्तांसाठी आषाढी यात्रेनिमित्त विशेष 'विठ्ठल दर्शन एक्सप्रेस' सोडण्यात येते. यावर्षी वाढत्या भक्तांची संख्या पाहता रेल्वे डब्यांमध्ये वाढ केली आहे. दरवर्षी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केवळ १६ डब्बे असतात. परंतु, या वर्षी या विशेष रेल्वेला दोन डब्बे वाढवून १८ डब्ब्यांची रेल्वे सोडण्यात आली आहे.
त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त भाविक यावेळी पंढरपूर वारीला रवाना झाले आहेत. यातील विठ्ठल दर्शनाची पहिली रेल्वे रविवारी दुपारी ४.३० वाजता रवाना झाली. यावेळी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सकाळी ११ वाजल्यापासून खामगाव येथील रेल्वे स्थानकावर भाविकांनी गर्दी केली होती.