ETV Bharat / state

प्रशासकीय अधिकाऱ्याकडूनच नियमांचे उल्लंघन; विद्युत वाहिनचे खांब तोडून बांधकाम

महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीजवळ असलेल्या भूखंडावरून ३३ किलोव्हॅटची विद्युत वाहिनी गेली आहे. ही विद्युत वाहिनी अनेक वर्षांपूर्वी गेलेली आहे. नियमांनुसार या विजेच्या तारांखाली बांधकाम करण्यास मनाई असून धोकादायक सुद्धा आहे. असे असतानाही शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी पदावर राहून आता निवृत्त झालेल्या प्रकाश वाघ यांनी प्लॉट विकत घेऊन चक्क त्या तारांखाली घराचे बांधकाम केले आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्याकडूनच नियमांचे उल्लंघन
author img

By

Published : Jul 28, 2019, 12:03 AM IST

बुलडाणा - खामगाव - शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीजवळ असलेल्या भूखंडावरून ३३ किलोव्हॅटची विद्युत वाहिनी गेली आहे. ही विद्युत वाहिनी अनेक वर्षांपूर्वी गेलेली आहे. नियमांनुसार या विजेच्या तारांखाली बांधकाम करण्यास मनाई असून धोकादायक सुद्धा आहे. असे असतानाही शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी पदावर राहून आता निवृत्त झालेल्या प्रकाश वाघ यांनी प्लॉट विकत घेऊन चक्क त्या तारांखाली घराचे बांधकाम केले आहे. एव्हढेच नव्हे तर विजेचे खांबही घरात घेऊन विद्युत वहिनीशी छेडछाड करत खांबांचे आधारक तोडले. यासंदर्भात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वाघ यांना वेळोवेळो नोटीस देऊनही या मुजोर अधिकाऱ्याने त्यांना दाद दिली नाही. शहर पोलिसांत ६ महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. यामुळे महावितरण अधिकारी हतबल झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रकाश वाघ हा मुजोर अधिकारी कार्यरत होता.

प्रशासकीय अधिकाऱ्याकडूनच नियमांचे उल्लंघन

सध्या हा अधिकारी १५ दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाला. वाघ यांच्या घराचे बांधकाम खामगाव - शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीजवळ हंसराज नगर मध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी वाघ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे त्याठिकाणाहून यापूर्वीच ३३ किलोव्हॅट विद्युत वाहिनी गेलेली आहे. नियमानुसार या विद्युत वाहिनीच्या शेजारी किंवा तारांच्या खाली बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. शिवाय यामुळे जीवालाही धोका होऊ शकतो.असे असतानांही मुजोर सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश वाघ यांनी त्याठिकाणी प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम सुरू केले. बांधकाम करत असताना वाघ यांनी चक्क विद्युतवाहिनीचे खांबही त्यांच्या घरात घेतले आणि खांबांचे आधारक तोडून टाकले. आधारक तोडल्याने भविष्यात यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या घरातली लोकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. मात्र, याची जाणीव असतानाही या मुजोर अधिकाऱ्याने या विद्युत वाहिनीखाली आपल्या घराचे बांधकाम केले आहे.

याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घरमालक प्रकाश वाघ यांना वेळोवेळी नोटीस देऊन कळवले. मात्र, मुजोर अधिकारी वाघ यांनी त्या तारांखाली घराचे बांधकाम सुरूच ठेवले आणि त्यांच्या घरात त्यांनी चक्क या ३३ किलोव्हॅट विद्युत वाहिनीचेच खांब घेतले. गटविकास अधिकारी वाघ ऐकत नसल्याचे पाहून शेवटी महावितरणच्या अधीकाऱ्यांनी खामगाव पोलिसांत त्यांच्याविरुद्ध ६ महिन्यांपूर्वी कारवाई साठी तक्रार ही दिली होती. मात्र, तक्रार देऊन आज रोजी ६ महिने उलटले तरीही शहर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

यापूर्वी त्या ठिकाणी घटना घडलेली असतांनाही वाघ यांनी घराचे बांधकाम सुरूच ठेवले. विशेष म्हणजे घराचे बांधकाम व्हावे म्हणून वाघ यांनी खासदार, पालकमंत्री, आणि उर्जमंत्र्यांनाही निवेदन देऊन त्याठिकाणी बांधकाम करू द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा अधिकारी महावितरणाच्या अधिकाऱ्यांवरही दबाव टाकत असे. तर ऊर्जामंत्र्यांच्या कार्यालयानेही नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यासंदर्भात अधिकारी प्रकाश वाघ यांना विचारले असता त्यांनी मात्र कॅमेऱ्यासमोर स्पष्ट बोलण्यास नकार दिला. तसेच पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला तर मी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाईल, असा दमही दिला. महावितरणाने माझ्याविरुद्ध न्यायालयात जावे, असा मुजोर सल्लाही त्यांनी दिला.

शिवाय तुम्हाला प्रतिक्रिया देण्यास मी बांधील नाही, असे उद्धट उत्तरही या अधिकाऱ्याने दिले. शिवाय मी परवानगी घेऊनच बांधकाम केल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक अधिकारी मात्र या अधिकाऱ्यासमोर हतबल झाले आहे. भविष्यात जर काही दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुजोर सेवानिवृत्त अधिकाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Intro:Body:बुलडाणा:- खामगाव - शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटी जवळ असलेल्या प्लॉटमधून ३३ kv  विद्युत वाहिनी गेलेली असून हि विद्युत वाहिनी फार जुनी गेलेली आहे ..नियमांनुसार  या तारांच्या खाली बांधकाम करण्यास मनाई असून धोकादायक सुद्धा आहे .. असे असताना ही शेगाव पंचायत समिती मध्ये  गटविकास अधिकारी पदावर असताना प्रकाश वाघ यांनी प्लॉट विकत घेऊन चक्क त्या तारांखाली घराचे बांधकाम केलेय .. एव्हढेच काय त्याचे खांब ही घरात घेऊन विद्युत वहिनीला छेडछाड करून त्याचे स्टे तोडले .. यासंदर्भात महावितरण च्या अधिकाऱ्यांनी वाघ यांना वेळोवेळो नोटीस देऊनही या मुजोर अधिकाऱ्याने त्यांना दाद दिलीय नाहीय .. तर शहर पोलिसांत ६ महिण्यापुर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी सुद्धा कारवाई केली नाहीय .. यामुळे महावितरण अधिकारी हतबल झालेय .. 

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रकाश वाघ हा मुजोर अधिकारी  कार्यरत होता .. सध्या हा मुजोर अधिकारी १५ दिवसांपूर्वी  सेवानिवृत्त झाला असून प्रकाश वाघ असे या मुजोर अधिकाऱ्याचे नाव आहे.वाघ यांच्या घराचे बांधकाम खामगाव - शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटी च्या जवळ  हंसराज नगर मध्ये सुरूय .. ज्या ठिकाणी वाघ यांच्या घराचे बांधकाम सुरूय त्याठिकाणी यापूर्वीच ३३ kv विद्युत वाहिनी गेलेली आहे .. नियमानुसार या विद्युत वाहिनी च्या शेजारी किंवा तारांच्या खाली बांधकाम करणे सक्त मनाई आहे , शिवाय याचा जीवाला धोका ही होऊ शकतो .. असे असतानांही मुजोर सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश वाघ यांनी त्याठिकाणी प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम सुरु केलेय .. बांधकाम करत असताना वाघ यांनी चक्क वाहिनी चे खांब ही त्यांच्या घरात घेतले आणि वाहिने चे स्टे तोडून टाकले .. स्टे तोडल्याने भविष्यात यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि या घरातली लोकांच्या जीवाला ही धोका होऊ शकतो .. मात्र याची जाणीव असताना ही या मुजोर अधिकाऱ्याने ह्या विद्युत वाहिनीखाली आपल्या  घराचे बांधकाम केलेय...    याची माहिती महावितरण च्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घरमालक प्रकाश वाघ याना वेळोवेळी नोटीस देऊन कळविले , मात्र मुजोर अधिकारी वाघ यांनी त्या तारांखाली घराचे बांधकाम सुरूच ठेवेल आणि त्यांच्या घरात त्यांनी चक्क या ३३ kv चे खांब घेतले .. गटविकास अधिकारी वाघ ऐकत नसल्याचे  पाहून शेवटी महावितरण च्या अधीकाऱ्यानी खामगाव पोलिसांत त्यांच्याविरुद्ध ६ महिन्यांपूर्वी  कारवाई साठी तक्रार ही दिलीय .. मात्र तक्रार देऊन आज रोजी ६ महिने उलटले तरीही शहर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाहीय .. 

Byte:-ए आर मोहता , उपकार्यकारी अभियंता , महावितरण , शेगाव .. 

यापूर्वी त्या ठिकाणी घटना घडलेली असतांनाही वाघ  यांनी घराचे बांधकाम सुरूच ठेवेल .. विशेष म्हणजे घराचे बांधकाम व्हावे म्हणून वाघ यांनी खासदार , पालकमंत्री , उर्जमंत्री यांनाही निवेदन देऊन त्याठिकाणी  बांधकाम करू द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती मिळतेय .. आणि महावितरण च्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असे .. तर ऊर्जामंत्र्यांच्या कार्यालयाने ही नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश महावितरण च्य  अधिकाऱ्यांना दिलेले आहेत .. यासंदर्भात अधिकारी  प्रकाश वाघ याना विचारले असता त्यांनी मात्र कैमेरासमोर स्पष्ट बोलण्यास नकार देत पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला तर मी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाईल आणि  त्यांनीही माझ्याविरुद्ध न्यायालयात जावे , शिवाय तुंम्हाला बाईट देणे बंधनकारक नाही , असे उद्धट उत्तर दिलेय ..तर परवानगी घेऊन त्यांनी बांधकाम केले असल्याचे सांगितले .. 

Byte:-प्रकाश वाघ , सेवनिवुर्त्त , प्रभारी  गटविकास अधिकारी , शेगाव .. 

स्थानिक अधिकारी मात्र या अधिकाऱ्यांबद्दल हतबल झालेय असून  भविष्यत जर का काही घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची ? .. म्हणून  आता या मुजोर सेवानिवुर्र्त प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात , हे पाहणे गरजेचे आहे .. 

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.