ETV Bharat / state

Unseasonal Rain In Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; अनेक घरांची छपरे उडाली, झाड जळून खाक

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मोताळा आणि बुलढाणा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. हवामान खात्याने आणखी काही दिवस विदर्भात अवकाळी पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Unseasonal Rain
अवकाळी पाऊस
author img

By

Published : Apr 26, 2023, 10:44 PM IST

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील वझर गावात प्रचंड पावसासह गारपीट आणि विजा कोसळल्या आहेत. वझर गावात वीज कोसळून एक झाड जळून खाक झाले आहे. त्यासोबतच या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अनेक घरांची छप्परे देखील उडून गेली आहे.

अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मोताळा आणि बुलढाणा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. खामगाव व मोताळा तालुक्यात जोरदार गारपीटही झाली आहे. तर अनेक ठिकाणी विजा पडण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा थेट फटका बसताना पाहायला मिळतोय. हवामान खात्याने आणखी काही दिवस विदर्भात अवकाळी पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज : दोन आठवड्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 7000 शेतकऱ्यांच्या 4000 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते. त्या पाठोपाठ आलेल्या अवकाळी पावसाने 1200 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. संग्रामपूर व खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची व झाडांची पडझड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात आणखी काही दिवस असाच अवकाळी गारपीट आणि पाऊस बरसणार असल्याचं अंदाज हवामान खात्यासह हवामान विशेषतज्ञ पंजाब डक यांनी वर्तवला आहे. 26 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान विदर्भ व मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात प्रचंड अवकाळी पावसाचा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवला आहे. त्यामुळे अजूनही अवकाळी ढग शेतकऱ्यांवर बरसणार आहेत यात शंका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून नुकसानीपासून शेतकऱ्यांना बचाव करता येईल. शेतात कामे सुरू असताना वादळी वारा आणि विजा असल्यास झाडाखाली उभे राहू नये, त्याचबरोबर शेतमालाची काळजी घ्यावी, अशा विविध प्रकारचे सल्ले या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी देण्यात आले आहेत.

हेही वाचा : बिबट्या गावात शिरताच गावकऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेत केला पाठलाग; पाहा व्हिडिओ

etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.