ETV Bharat / state

Sexual Abuse With Student: तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थावर शिक्षकाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार - Unnatural sexual abuse

जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलावर शिक्षकाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनीही शिक्षकाला चोप दिला.

Sexual Abuse With Student
विद्यार्थावर शिक्षकाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Jul 9, 2023, 5:24 PM IST

Updated : Jul 9, 2023, 9:55 PM IST

बुलडाणा: जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेत किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेतील एका शिक्षकाने तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसात नराधम शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

भर वर्गात अनैसर्गिक कृत्य: हा संपूर्ण प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत आहे. तो वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पुस्तक वाचन करीत होता. त्यावेळी आरोपी शिक्षकाने त्याला समोर बोलावून त्याच्यासोबत भर वर्गात अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत पीडित विद्यार्थ्यांच्या आईने 8 जुलै रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या कलमांनुसार गुन्हा दाखल: जळगाव पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध अपराध क्रमांक 354/23, 377, 506 भादंवीसह कलम, 4, व 6 पोक्सो कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहे.

विद्यार्थ्यावर शिक्षकाने अत्याचार केल्याने खळबळ : तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्यात शिक्षकाने भर वर्गात अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत साशंकता असल्याचे पालक बोलत आहेत. नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा करण्यात यावी असा पवित्रा आता पालकांनी घेतला आहे.

हेही वाचा:

  1. Nashik Crime News : नाशिकमध्ये एटीएमचं गेलं चोरीला!, पहा सीसीटीव्ही फुटेज
  2. Mumbai Crime: मसाजच्या नावावर हॉटेलमध्ये बोलावले अन् बंदुकीच्या धाकावर लुटले; वाचा धक्कादायक घटना
  3. Mumbai Crime: चेष्टेत अनोळखी क्रमांकावरून मित्राला केला 'हा' व्हॉट्सअप मेसेज, पोलिसांनी थेट तुरुंगात केली रवानगी

Last Updated : Jul 9, 2023, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.