ETV Bharat / state

Nitin Gadkari : भारतातील रस्ते जनतेची संपत्ती, आम्ही सर्व जनतेचे सेवक - नितीन गडकरी - नितीन गडकरी बुलढाणा जिल्ह्यात

भारतातील रस्ते हे भारताची संपत्ती असून आमदार, खासदार व मंत्री हे सगळे जनतेचे सेवक असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते खामगाव येथे एका सभेला संबोधित करत होते.

Nitin Gadkari
नितीन गडकरी
author img

By

Published : Jun 11, 2023, 4:36 PM IST

नितीन गडकरी

बुलडाणा : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज बुलढाणा जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी खामगाव येथे एका सभेला संबोधित केले. सभेत बोलताना ते म्हणाले की, मी रस्ते तयार करताना कधी पैसे घेत नाही. रस्ते निर्माण करताना ते प्रामाणिकपणेच तयार झाले पाहिजे याचाच विचार करतो.'

'रस्ते ही भारताची संपत्ती' : यावेळी बोलताना गडकरी यांनी सरकारी यंत्रणेमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर देखील बोट ठेवले. ते म्हणाले की, भारतात जे काही रस्ते आहेत ते संपूर्ण भारताची संपत्ती आहे. आमदार, खासदार, मंत्री हे सगळे जनतेची सेवक असल्याचे नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले आहे. ते म्हणाले की, वेळ प्रसंगी कंत्राटदाराने जर बरोबर काम केले नाही तर मी त्याची खरडपट्टी काढल्याशिवाय राहत नाही.'

विदर्भातील खारपान पट्टा नाहीसा करण्याचा प्रयत्न करेल : सभेदरम्यान नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्वात ज्वलंत अशा खारपाण पट्ट्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, मी एका जलसिंचन प्रकल्पामुळे खारपान पट्ट्यातील खारपटपणा 2500 हून 300 पर्यंत आणू शकलो. पुढील काळात विदर्भात असे 900 प्रकल्प तयार करून खारपान पट्टा समूळ नष्ट करता येऊ शकतो. विदर्भात जर जलसिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवलेत तर निश्चितच विदर्भातील खारपान पट्टा नाहीसा करण्यात सरकारला यश येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खारपणपट्ट्यात 900 बंधारे निर्माण केले जातील : राज्यातील बुलढाणा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यात पूर्णा नदीच्या काठावर 3000 चौरस किलोमीटर कारखान्याच्या परिसरात गोड पाणी उपलब्ध होणार आहे. जमिनीपासून पन्नास फुटाच्या खोलीवर हे पाणी असणार आहे. याबाबत काम सुरू झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प यशस्वी झाला तर खारपणपट्ट्यात एकूण 900 बंधारे निर्माण केले जातील, अशी माहिती यावेळी नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हे ही वाचा :

  1. Nitin Gadkari News : बारोळा येथील गोड पाण्याचा प्रकल्प यशस्वी झाला तर, 894 गावांचा प्रश्न सुटेल- नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.