ETV Bharat / state

बुलडाणा : मलकापूर जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; दोन जण जागीच ठार - वाघुड

दुचाकीस दोनशे मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार झाला आहे. गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातग्रस्त दुचाकी
author img

By

Published : Jul 12, 2019, 11:56 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघुड गावाजवळ बजरंग दाल मिल समोर शुक्रवारी 12 जुलै रोजी दुपारी घडली आहे.

मलकापूर जवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

दुचाकीस दोनशे मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार झाला. बजाज पल्सर दुचाकीने दोघेजण मलकापूरवरून नांदूराकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.

पोलीस पंचनाम्या दरम्यान मृताच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून विरेंद्र सिंग राजपूत आणि बलराम सिंग राजपूत (दोघे रा. पटोली जि. ताजापूर, इंदौर, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे असल्याचे समजले. गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Intro:Body:बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीक नॅशनल हायवे वर भरधाव ट्रक ने दुचाकीस्वारास चिरडल्याने ते दोघेही जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी 12 जुलै रोजी दुपारी घडलीय...

वाघुड गावा नजिक बजरंग दाल मिल समोर भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले दुचाकीस दोनशे मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना दोन वाजे दरम्यान घडली. बजाज पल्सर दुचाकीने दोघेजण मलकापूर वरून नांदूरा कडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वारांना चिरडून ट्रकने दुचाकीस दोनशे मीटर पर्यंत घासत नेले. पोलीस पंचनाम्या दरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून विरेंद्र सिंग राजपूत, बलराम सिंग राजपूत, दोघे राहणार ग्राम पटोली जि.ताजापुर (इंदौर) मध्य प्रदेश असल्याचे समजले गावकऱ्यांच्या मदतीने अँम्बुलन्सद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.