ETV Bharat / state

बुलडाण्यात कोरोनाच्या बचावासाठी यमदूताची गांधीगिरी... - Buldana Corona Awareness news

गेली सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाचा धाक जिल्ह्याभरात आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मेहकर तालुक्यातील गवढांळा गट ग्रामपंचायतच्या महिला सरपंच जाधव आगळी-वेगळी शक्कल लढवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू केली आहे. जाधव यांनी आपल्या पतीला यमदूताची वेशभूषा करून सोमवारी शहरात जनजागृती केली आहे.

बुलडाणा लेटेस्ट न्यूज
बुलडाणा लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 21, 2020, 1:07 PM IST

Updated : Oct 21, 2020, 2:46 PM IST

बुलडाणा - कोरोनापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करणे हाच एकमात्र पर्याय आहे. मार्गदर्शकतत्त्वांचे पालन केले नाही तर, आपल्याला घ्यायला यमदूत येऊ शकतात. या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी बुलडाण्यात एका यमदूताने नागरिकांना या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देत गांधीगिरी केली. ही शक्कल लढवली मेहकर तालुक्यातील गवढांळा गट ग्रामपंचायतच्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी... चक्क आपल्या पतीला यमदूत बनवून सोमवारी, बुलडाणा शहरात कोरोना कसा रोखला जाईल, त्यासंदर्भात त्यांनी जनजागृती केली.

बुलडाण्यात कोरोनाच्या बचावासाठी यमदूताची गांधीगिरी...

हेही वाचा - परिचारिकांना अचानक कामावरून काढल्याच्या निषेधार्थ 'मनसे'चे आंदोलन; अधिकाऱ्याला घेतले फैलावर

गेली सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाचा धाक जिल्ह्याभरात आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मेहकर तालुक्यातील गवढांळा गट ग्रामपंचायतच्या महिला सरपंच जाधव आगळी-वेगळी शक्कल लढवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू केली आहे. जाधव यांनी आपल्या पतीला यमदूताची वेशभूषा करून सोमवारी शहरात जागृती केली आहे.

या वेळी, 'हम यमदूत हैं. विना मास्क बाहर घुमोगे तो, हम उसे साथ लेके जाएंगे' असा संदेश देत असलेल्या यमदूताची गांधीगिरी पाहावयास मिळाली. या यमदूताने नागरिकांच्या तोंडावर मास्क नसल्यास हातात गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी केली. ‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेबाबतही जनजागृती केली आहे. जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य रस्त्यावर ही जनजागृती केली आहे.

हेही वाचा - सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Oct 21, 2020, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.