ETV Bharat / state

बुलडाणा : धमक्या देऊन लुटणारे आरोपी ताब्यात ! - BULDANA CRIME

धमकी देऊन लुटणाऱ्यास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एका शिक्षक दाम्पत्यास जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले असल्याची कबुली या आरोपीने दिली आहे. अरविंद लक्ष्मण शिंदे असे या आरोपीचे नाव आहे.

बुलडाणा
THREE THIEVES
author img

By

Published : Oct 17, 2020, 1:34 PM IST

बुलडाणा :- अंढेरा येथे धमकी देऊन लुटणाऱ्यास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एका शिक्षक दाम्पत्यास जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले असल्याची कबुली या आरोपीने दिली आहे. अरविंद लक्ष्मण शिंदे असे या आरोपीचे नाव आहे.

अंढेरा पोलीस स्टेशनला कलम ३९२, ३४च्या जबरी चोरीतील मुख्य गुन्हेगार देऊळगांव राजा परिसरात वास्तव्यास असल्याची गोपीनाय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. सापळा रचून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने अंढेरा हद्दीतील मेरा खुर्द येथे एका शिक्षक दाम्पत्यास जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले असल्याची कबुली दिली. आरोपीचे साथीदार संदीप प्रकाश गुराळकर व विलास बबन सोळंके यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने चिखलीतील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे अजय वाडेकर यांना विकल्याची माहिती दिली. त्यानंतर अजय वाडेकर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या ताब्यातून १६ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल, ८o हजाराच्या २ मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.