ETV Bharat / state

बुलडाणा कोरोना अलर्ट : शनिवारी पुन्हा आढळले तीन कोरोनाबाधित, आकडा 59 वर - बुलडाणा कोरोना अलर्ट

जिल्ह्यात शनिवारी रात्री ३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये मलकापूर येथील २७ वर्षीय व ५० वर्षीय महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत झाले आहेत.

बुलडाणा कोरोना अलर्ट
बुलडाणा कोरोना अलर्ट
author img

By

Published : May 31, 2020, 7:58 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शनिवारी ३० मे रोजी रात्री ३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५९ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात शनिवारी रात्री आढळून आलेल्या ३ कोरोनाबाधितांमध्ये मलकापूर येथील २७ वर्षीय व ५० वर्षीय महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. सदर अहवाल यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २३६ निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत झाले आहेत.

आतापर्यंत ३३ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात २३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज रविवार ३१ मे रोजी ३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. तर, आज रोजी ४८ नमुने हे अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण १ हजार २३६ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर जी पुरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.