बुलढाणा : आषाढ महिना लागला की, विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात. दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते. कोरोना आधी ४ फेऱ्या सोडण्यात येत होत्या, मात्र आता त्यात कपात करण्यात आली आहे. आता २ फेऱ्या सोडण्यात येणार आहे. यंदा २० बोगींची ही एक्सप्रेस असणार आहे. त्यात जनरल बोगी १, आरक्षित बोगी ६, एसी २ टायर १ बोगी, एसी ३ टायर १ बोगी, गार्डसाठी २ बोगी यात प्रवाशी व दिव्यांगांना बसण्याची सुविधा राहणार आहे. एकूण १५०० भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस जाणार आहे. तर पंढरीतून २७ व ३० जूनला पहाटे ५ वाजता परतीच्या फेऱ्या सुटणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता या फेऱ्या खामगावात पोहचतील.
विठ्ठल एक्सप्रेसला कोणतीही सवलत नाही : विठ्ठल दर्शन एक्सप्रेस विशेष गाडी असल्यामुळे त्यात भाडे सवलत देण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांना इतर गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून सवलत देण्यात येते. मात्र विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडीत कोणतीही सवलत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. या गाडीत जनरल बोगीत २२५ रुपये, आरक्षित तिकीटासाठी ४८५ रुपये, एसी टू टायरमध्ये १८७५ तर एसी थ्री टायरमध्ये १३१५ रुपये इतके भाडे असणार आहे. एकंदरीत यावर्षी पेरण्या खोळंबल्या असल्या तरी, भाविक आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता मिळेल त्या वाहनाने पंढरपूरला पोहोचण्याकरता प्रयत्न करत आहे.
केसीआर सोलापूर दौऱ्यावर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मंगळवारी सोलापुरातील पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. केसीआर यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. पंढरपूर दौऱ्यानिमित्ताने केसीआर यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला पक्ष रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्राची विविध अंगांनी समृद्धी पाहता केसीआर यांनी आपला मोर्चा आता तिकडे वळवला असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -
- Ashadhi Wari 2023i : आषाढी एकादशी, विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीची वारी; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
- Ashadhi Wari 2023 माऊलींकडे काही मागायचे नसते जे मनात असेल ते माऊली करते देवेंद्र फडणवीस
- Insurance Cover To Warkari : वारकऱ्यांसाठी खुशखबर! वारीदरम्यान मिळणार आता विम्याचे कवच, मुख्यमंत्र्यांची घोषणा