बुलडाणा - जिल्ह्यातील धार्मिक स्थळ सैलानी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे कामादरम्यान रस्त्याचे खोदकाम करताना घराचा एक मजला कोसळण्याची घटना रविवारी (दि. 24 नोव्हेंबर) घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने परिसरात मात्र, एकच खळबळ उडाली होती.
बुलडाणा जिल्ह्यात हातनी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरू आहे. धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात आहे. त्यामुळे सैलानीमध्ये रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. येथील मो. नफीस हाजी मो. अय्यूब यांच्या घराला कोरून रस्ता खोदण्यात आला.
दरम्यान, रविवारी (दि. 24 नोव्हेबर) मो. नफिस यांच्या घराचा एक मजला कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. घर कोसळण्याच्या काही वेळा पूर्वीच विद्यार्थी घराबाहेर आले होते. या घरात मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचा इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवले होते. घर पडल्याने पूर्ण सहित्याचा नुकसान झाले आहे.
हेही वाचा - 'अजित पवारांना क्लीन चिट... भ्रष्टाचाराला आळा घालण्याची भाजपची घोषणाही हवेत विरली'