बुलडाणा - उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाचा आदेश निर्गमीत करून वेतन सुरू करावे, अघोषीत उच्च माध्यमिक शाळा घोषीत करुन आर्थीक तरतुद करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र रज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांना तातडीने वेतन सुरू करावे
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विनाअनुदानीत शाळांसाठी 106 कोटी 74 लाख 72 हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. हा निधी वितरीत करण्यासाठी आदेश काढावेत. तसेच गेल्या 18 वर्षांपासून वेतन मिळत नसतानाही काम करणाऱ्या शिक्षकांना तात्काळ वेतन सुरू करावे या प्रमुख मागण्यासाठी आज बुलडाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोहन शैदाळे, पुरुषोत्तम किलबिले, प्रदीप खर्चे, रविंद्र रावणचौरे, गौतम वाकोडे, विनोद गवई, इमरान, सतिष गावंडे यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले होते.