बुलडाणा: जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाण्यातील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. शिक्षक आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहेत.
नराधम शिक्षकाचे कृत्य: राजीव गांधी मिलिटरी स्कूल मधील अविवाहित असलेल्या एका शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पीडित मुलांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्र उत्तम हिवाळे असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याने यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचे गैरकृत्य केलेले असल्याचे समजते. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाला माफीनामा लिहून देत तो बचावला होता.
विद्यार्थांना दिली धमकी: तुम्हाला प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये नापास करेल, अशी धमकी देत आरोपी शिक्षक धर्मेंद्र हिवाळे याने दहावीच्या वर्गातील दोन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले. विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सतत चार दिवस त्या शिक्षकाने हा किळसवाणा आणि संतापजनक प्रकार केला. पीडित विद्यार्थ्यांनी सदर बाब आपल्या पालकांना आणि पालकांनी मुख्याध्यापकांना कळवली. राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या व्यवस्थापनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी धर्मेंद्र हिवाळे याच्या विरोधात थेट पोलीस स्टेशन गाठले. शहर पोलिसांनी आरोपी शिक्षक हिवाळे विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक कृत्य: घडलेल्या प्रकाराबाबत पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात 26 फेब्रुवारीच्या रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो राजीव गांधी मिलिटरी स्कूल, कोलवड ता.जि. बुलडाणा मध्ये 10 व्या वर्गात शिकत असून त्यांना विज्ञान शिकविणाऱ्या आरोपी शिक्षक धर्मेंद्र उत्तमराव हिवाळे रा.मिलिंद नगर, बुलडाणा याने तक्रारदार व इतर एका विध्यार्थीवर अनैसर्गिक कृत्य केले. सदर लैंगिक अत्याचाराबद्दल कोणाला काही सांगितले तर प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करेन व जिवानिशी मारून टाकीन अशी धमकी दिली होती.
आरोपी शिक्षक फरार: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थ्याने घडलेला प्रकार मुख्यध्यापक व आपल्या घरी दिली. या प्रकरणी पीडित विध्यार्थ्याने मुख्याध्यापक व इतर शिक्षकांसोबत 26 फेब्रुवारीच्या रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपी शिक्षक धर्मेंद्र उत्तमराव हिवाळे विरुद्ध अनैसर्गिक कृत्य व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंनधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असून पुढील तपास एपीआय जयसिंग पाटील करीत आहे.
शिक्षकावर बडतर्फची कारवाई: विशेष बाब म्हणजे काही वर्षे आगोदर सुद्धा या शिक्षकाने शाळेत असेच कृत्य केल्याची बाब समोर आली होती. आरोपी शिक्षकान शाळा व्यवस्थापनाला माफीनामा लिहून दिला होता. त्याचवेळी या नराधम शिक्षकावर योग्य कारवाई झाली असती तर पुन्हा असे घडले नसते. या सोबतच नराधम शिक्षकाने किती विद्यार्थ्यासोबत असे कृत्य केले याची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सदर नराधम शिक्षकाने या आधी सुद्धा असा प्रकार केल्याने त्याला सक्त ताकीद देण्यात आली होती. मात्र परत त्याने असा किळसवाणा प्रकार केल्याने त्या शिक्षकाला बडतर्फ करणार असल्याची माहिती स्वतः शाळेच्या प्राचार्यांनी दिली आहे.
हेही वाचा: Petrol Pump Robbery Ahmednagar: पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद