ETV Bharat / state

बुलडाणा : टिपेश्वर’च्या वाघाने पाच महिन्यात गाठले ज्ञानगंगा अभयारण्य - tiger in botha forest buldana

तेलंगाणा राज्यातून सुरवातीला हा वाघ यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला. तीन वर्ष वय असलेला हा वाघ आता ज्ञानगंगा अभयारण्यात आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत या वाघाने तब्बल 1300 किलोमीटरचे अंतर कापले आहे.

tiger
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 2, 2019, 4:08 PM IST

बुलडाणा - यवतमाळ जिल्ह्यातील ‘टिपेश्वर’ अभयारण्यातून ज्ञानगंगा अभयारण्यात एका वाघाचे आगमन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून विविध तालुक्यांमधील जंगल परिसरात तो फिरत होता. वन विभागाकडून त्याच्या हालचालींवर वर लक्ष ठेवले जात आहे.

tiger
वाघाच्या पाऊलखुणा

तेलंगाणा राज्यातून सुरवातीला हा वाघ यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला. तीन वर्ष वय असलेला हा वाघ आता ज्ञानगंगा अभयारण्यात आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत या वाघाने तब्बल 1300 किलोमीटरचे अंतर कापले आहे.

हेही वाचा - वाघाचा 'तो' व्हायरल व्हिडिओ फेक; राजुरा वनविभाग वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची पुष्टी

ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. जैवविविधता भरपून असल्याने वाघासाठी इथे मुबलक खाद्य उपलब्ध आहे. शिवाय वन विभागाच्या वतीने ठीकठीकाणी पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. अभयारण्यात वाघाच्या वास्तव्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याने तो याठिकाणी आणखी काही दिवस राहू शकतो, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

Intro:Body:mh_bul_Tiger entered Buldana district_10047

Story : टी-वन सी-वन वाघ दाखल झाला बुलडाणा जिल्ह्यात
बोथा भयारण्यात सध्या आहे बस्तान
टिपेश्वर’च्या वाघाने पाच महिन्यात गाठले ज्ञानगंगा अभयारण्य
पाच महिन्यात कापले १३०० कि.मी.चे कापले अंतर

बुलडाणा : यवतमाळ जिल्ह्यातील ‘टिपेश्वर’ अभयारण्यातून टीवन सीवन वाघाने बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला असून मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यात येणाऱ्या अभयारण्यात तो फिरत आहे. वन विभागाकडून त्यावर लक्ष ठेवल्या जात आहे.
तेलंगाणा या राज्यातून महाराष्टरातील विदर्भ क्षेत्रात मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात पोहचलेल्या तीन वर्षाच्या टीवन सीवन वाघाने आता थेट बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले आहे. या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल एक हजार तीनशे किमीचे अंतर या वाघाने कापले आहे. यवतमाळ, नांदेड, तेलंगणा, बुलडाणा मार्गे मेळघाट असा त्याने केलेला प्रवास असून सध्या तो खामगाव वन परिक्षेत्राचे अंतर्गत येणाऱ्या भागात वास्तव्यास आहे. या अभयारण्यात या वाघाच्या वास्तव्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी आणखी काही दिवस तो राहणार असलयाचे चिन्हे दिसून येत आहे. ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांसाठी प्रसिद्ध असून जैवविविधतेसह वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजिवाची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर आहे शिवाय वन विभागाच्या वतीने थिठिकाणी पाण्याची हि व्यवस्था असल्याने सदर वाघाचा मुक्काम या जिल्ह्यात आणखी काही दिवस राहणार असलयाचे समजते.

- फहीम देशमुख खामगावConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.