ETV Bharat / state

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

author img

By

Published : Jul 30, 2020, 11:00 AM IST

Updated : Jul 30, 2020, 2:07 PM IST

स्टोरी:- स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचा फेसबुक अकाउंट हॅक, हॅकरकडून पैश्यांची मागणी; अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल.

ravikant tupkar
रविकांत तुपकर

बुलडाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नावाने मित्रमंडळ फेसबुक पेज हॅक करत त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. हे फेसबुक पेज हॅक करत त्यांच्या नावावर पैशाची मागणी करीत लुटमारीचा ऑनलाईन फंडा वापरला जात आहे. या प्रकरणी रविकांत तुपकर यांनी तक्रारीवरुन अज्ञात हॅकरविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. तर माझ्या नावावर कोणीही ऑनलाईन पैसे देऊ नये, याला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकारण आणि चळवळीत काम करतांना नेत्यांच्या जीवनाचा सोशल मीडिया हे अविभाज्य घटक बनला आहे. काही वर्षांपूर्वी फेसबुकवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मित्रमंडळ यांच्या नावाचे पेज सुरू करण्यात आले होते. यानंतर ते पेज काही काळ नियमित होते. मात्र, गत एक ते दीड वर्षापासून त्या फेसबुक अकाऊंटवरुन काहीच कार्य होत नसताना हे फेसबुक अकाऊंट पेज सुरू आहे. मंगळवारी 28 जुलैच्या रात्रीपासून त्या फेसबुक अकाउंट हॅक करुन त्या पेजवर दोन 'गुगल पे' नंबर देऊन फेसबुक मित्रांना वारंवार मैसेज पाठवून पैशाची मागणी होत असल्याचे मॅसेज देण्यात येत आहेत, अशा प्रकारचे फोन तुपकर यांना येत आहे.

रविकांत तुपकर (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

हेही वाचा - सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भटक्या गुरांच्या मालकावर गुन्हा दाखल

यामुळे मी पैशाची मागणी केलेली नाही. माझ्या नावावर कोणीही ऑनलाईन पैसे देऊ नये व याला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन तुपकर यांनी केले आहे. कोणाची फसवणूक होऊ नये, म्हणून तुपकर यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात हॅकर विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे करीत आहे.

swabhimani's leader ravikant tupkar facebook account hacked case filed buldana
पैशे मागणीसंदर्भात करण्यात आलेले मेसेजेस.

Last Updated : Jul 30, 2020, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.