ETV Bharat / state

Makai Sakhar Karkhana Case : शेतकऱ्यांवर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू - रविकांत तुपकर - शेतकऱ्यांवर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू

साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल ( Chairman Digvijay Bagal ) यांनी मारहाण करत त्यांना बाहेर काढून दिले. यावर रविकांत तुपकर चांगलेच भडकले व उद्या आपण सोलापूरला जाणार आहोत. त्या मस्ती चढलेल्या दिग्विजय बागलची जिरवायला जात आहोत. शेतकऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकारानी ( Ravikant Tupkar ) दिला.

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर
author img

By

Published : Dec 12, 2021, 9:27 PM IST

Updated : Dec 12, 2021, 9:38 PM IST

बुलडाणा - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मकाई साखर कारखाना ( Makai Sakhar Karkhana Case ) येथे काही कार्यकर्ते व शेतकरी ( Swabhimani Shetkari Sanghatana ) एफआरपीचे पैसे मागण्यासाठी गेले होते. दरम्यान साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल ( Chairman Digvijay Bagal ) यांनी मारहाण करत त्यांना बाहेर काढून दिले. यावर रविकांत तुपकर चांगलेच भडकले व उद्या आपण सोलापूरला जाणार आहोत. त्या मस्ती चढलेल्या दिग्विजय बागलची जिरवायला जात आहोत. शेतकऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकारानी ( Ravikant Tupkar ) दिला. तसेच त्या साखर कारखान्याला गाळप करण्याचा परवाना नाही तरी बेकायदेशीर गाळप सुरू आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांचे एफआरपीचे साडेसहा कोटी रुपये बुडविले, असे कारनामे कोणाच्या भरवशावर करत आहात? असा सवालही तुपकरांनी केला आहे.

प्रतिक्रिया देतांना रविकांत तुपकर

काय आहे प्रकरण?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूरचे युवक जिल्हाध्यक्ष विजय रणदवे हे थकित वीज बिलासंदर्भात बोलणी करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मकाई कारखान्यावर गेले होते. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचवेळी दिग्विजय बागल यांनी विजय रणदिवे यांना मारहाण केली.

'शेतकऱ्यांना भाव वाढीसाठी झगडावं लागतं'

सोयाबीन-कापसाला राजाश्रय नसल्यामुळे शेतकऱ्यांना भाव वाढीसाठी झगडावं लागते. 9 टक्के क्षेत्र असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत. परंतु त्या तुलनेत सोयाबीन कापूस उत्पादकाला मिळत नाही, अशी खंतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भाव वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सोयाबीनचे भाव वाढले. हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे मतही त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

'राज्य सरकारने पिक विमा संदर्भात वेगळी भूमिका घ्यावी'

पिक विमा योजनेसंदर्भात बोलतांना ते म्हणाले, की शेतकरी आणि सरकार करोडो रुपये पिक विमा कंपनीला देते. मात्र त्या तुलनेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. करोडो रुपयाचा फायदा पिक विमा कंपनीला होत आहे. तेव्हा राज्य सरकारने पिक विमा संदर्भात वेगळी भूमिका घ्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी यांनी केले.

हेही वाचा - Makai Sahakari Sakhar Karkhana : मकाई साखर कारखान्याचे चेअरमनकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण

Last Updated : Dec 12, 2021, 9:38 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.