ETV Bharat / state

आठ महिन्यांचा चिमुकल्यासह आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ! - sangrampur

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे आठ महिन्यांच्या मुलासह आईने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मुलासह गळफास का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

८ महिन्यांचा चिमुकल्यासह आईने केली आत्महत्या
author img

By

Published : Jun 10, 2019, 11:55 PM IST

बुलडाणा- संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे आठ महिन्यांच्या मुलासह आईने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मृत आईचे नाव शिकराबाई दारासिंग चव्हाण (वय १९) असून तिने आपल्या ८ महिन्यांचा चिमुकला देवेंद्र दारासिंग चव्हाण याच्यासह गळफास घेतला आहे.

आठ महिन्यांच्या मुलासह आईने गळफास घेतल्याचे दृष्य

मृत महिलेचा पती दारासिंग चव्हाण (वय २१) याने सोनाळा पोलीस ठाण्याला फिर्याद दिली की, संध्याकाळी ५ वाजतादरम्यान शेती कामावरून लहान भाऊ आणि तो घरी परतल्यावर घराला कुलूप लावल्याचे दिसून आले. नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी रात्री शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही. सकाळी पुन्हा शोध घेतला असता सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अभयारण्यातील एका झाडाला मुलासह तिने गळफास घेतल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले आहे.

मुलासह गळफास का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सोनाला पोलीस करीत आहे. संग्रामपूर तालुक्यातील कामोद शिवार अंबाबारवा अभयारण्यातील पिंगळी बिट कंपार्टमेंट नंबर ४५४ सोनाळा रेंजमध्ये ही घटना उघडकीस आली असून सदर प्रकार हा आत्महत्येचा आहे की, घातपात याबाबत परिसरात चर्चेला ऊत आला आहे.

Intro:Body:बुलडाणा :आठ महिन्यांच्या मुलासह आईने गळफास घेतल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. गुमठी येथील शिकराबाई दारासिंग चव्हाण (वय १९) या विवाहितेने आपल्या आठ महिन्यांचा चिमुकला देवेंद्र दारासिंग चव्हाण याच्यासह गळफास घेतला ही आत्महत्या केली की हा घातपात आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे..

मृत विवाहित महिलेचा पती दारासिंग चव्हाण (वय २१, रा. नवी गुमठी) याने सोनाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली कि संध्याकाळी ५ वाजतादरम्यान शेती कामावरून लहान भाऊ आणि तो घरी परतल्यावर घराला कुलूप लावल्याचे दिसून आले. गावात विचारपूस केल्यावर विवाहिता लहान बाळाला घेऊन घरातून गायब असल्याचे निदर्शनास आले. नातेवाईक व इतर ठिकाणी रात्री शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही. सकाळी पुन्हा शोध घेतला असता सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अभयारण्यातील एका झाडाला मुलासह तिने गळफास घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मुलासह गळफास का घेतला याचे कारण अद्याप अष्पष्ट आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सोनाला पोलिस करीत आहे संग्रामपूर तालुक्यातील कामोद शिवार अंबाबारवा अभयारण्यातील पिंगळी बिट कंपार्टमेंट नंबर ४५४ सोनाळा रेंजमध्ये उघडकीस आली. सदर प्रकार हा आत्महत्याचा आहे की घातपात आहे याबाबत परिसरात चर्चेला ऊत आले आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.