ETV Bharat / state

बुलडाणा : लैंगिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटनंतर दोघांना अटक - लैंगिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

बुलडाणा तालुक्यातील एका छोट्याशा गावात अल्पवयीन 17 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेल्या सात दिवसांपूर्वी घडली होती. आता या मुलीच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली सुसाईड नोट घरात आढळली आहे. त्यामुळे आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये पीडितेचा चुलत भाऊही आहे. त्यामुळे कठोर कारवाईची मागणी होत आहे.

buldana
buldana
author img

By

Published : Sep 25, 2021, 8:52 AM IST

बुलडाणा : तालुक्यातील एका छोट्याशा गावात अल्पवयीन 17 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेल्या सात दिवसांपूर्वी घडली होती. आता या मुलीच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली सुसाईड नोट घरात आढळली आहे. त्यामुळे आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. ज्यामध्ये या मुलीवर गावातीलच दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. त्यांना कंटाळून या तरुणीने आत्महत्या केल्याचे नोटमध्ये लिहून ठेवले आहे. या दोन तरुणांपैकी एक जण हा मृतक तरुणीचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे.

सुसाईड नोटमुळे आत्महत्येचा खुलासा

बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील 17 वर्षीय तरुणीने 20 सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र दोन दिवसानंतर 22 सप्टेंबर रोजी घरात ठेवलेल्या भगवद्गीता या ग्रंथांमध्ये या अल्पवयीन मुलीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली सुसाईड नोट तिच्या वडिलांना आढळली. या सुसाईड नोटमध्ये तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग नमूद केला आहे. बदनामी आणि तिच्यावर वारंवार सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून त्या तरुणीने आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे लिहून ठेवले आहे.

आरोपींना अटक

त्यामुळे मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून 23 सप्टेंबर रोजी गावातीलच आरोपी सुनील उर्फ गणेश काळवाघे (24 वर्षे) आणि 22 वर्षीय निलेश मिसाळ याच्यावर बलात्कारासह पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करत आहेत. संपूर्ण राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमी होतांना दिसत नाहीत. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमध्ये पीडित तरुणीवर अत्याचार करणारा चुलतभाऊ असल्याने, नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. या आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - नीटच्या परीक्षेतील घोळ हा व्यापम पेक्षाही मोठा घोटाळा आहे - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.